जामीन मंजूर, पण सुटका होणार नाही! अरविंद केजरीवाल प्रकरणात मोठी अपडेट
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ईडी प्रकरणात केजरीवालांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
CM Arvind Kejriwal Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गेल्या 90 दिवसांपासून अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. जरी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असला तरी अरविंद केजरीवाल यांची पूर्ण सुटका झाली नाही. कारण सीबीआय प्रकरणात त्यांची सुटका झालेली नाही.
न्यायालय काय म्हणाले?
अरविंद केजरीवाल हे गेल्या 90 दिवसांपासून तुरुंगात आहेत. केजरीवाल हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असल्याची आम्हाला जाणीव आहे. त्यांनी पदावर कायम राहायचं की नाही तो त्यांचा निर्णय आहे. असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.
जामीन मंजूर, पण सुटका होणार नाही!
ईडी प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मिळाला असला तरीही केजरीवाल तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता नाही. कारण त्यांना ईडी प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला असला तरी त्यांची सीबीआय प्रकरणात त्यांची सुटका झालेली नाही. अरविंद केजरीवाल हे अद्याप देखील सीबीआयच्या न्यायालयीन तुरुंगात आहेत.
चौकशीने अटक होऊ शकत नाही
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपल्या निर्णयात तीन प्रश्न निश्चित केले असून प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं होते. ज्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना घोटाळ्याप्रकरणी दिलेले समन्स वैध मानले गेले होते. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे त्यांना पदावरून पायउतार होण्याचे निर्देश देऊ शकत नाही, हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. असे न्यायालयाने म्हटले. केवळ चौकशीच्या आधारे अटक करण्याची परवानगी देता येणार नाही, असं देखील न्यायालयाने म्हटले आहे.