नवी दिल्ली : शाहीन बागेला सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या दोघा मध्यस्थांनी आज भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन हे दुपारी शाहीन बाग इथे पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनाचा अधिकार मान्य केला असल्याचे रामचंद्रन यांनी आंदोलकांना सांगितले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आंदोलनाचा हक्क हा इतरांच्या हक्कांच्या आड येता कामा नये, असे सांगत हेगडे यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन महिन्यांपासून शाहीन बागेमध्ये CAAविरोधात आंदोलन सुरू आहे. रस्ता बंद झाल्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या आंदोलनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे पाऊल उचले आहे.