Corona Virus Case : कोरोनामुळे मृत्यचं तांडव, या शहरात तब्बल इतक्यांनी गमावला जीव
धोकादायक आणि जीवघेणा असलेला कोरोना व्हायरस (Corona Virus Case) पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे.
Corona Virus Case : धोकादायक आणि जीवघेणा असलेला कोरोना व्हायरस (Corona Virus Case) पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे. राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत 1 हजार652 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 1 हजार 702 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीचा पॉझिटिव्हीटी रेट हा 9.92% आहे. तर 6 हजार 809 जणांवर उपचार सुरु आहेत. (delhi corona update 17 august 2022 today 1 thousand 652 patient found in city and 8 deaths in the past 24 hours)
महाराष्ट्रात किती पॉझिटिव्ह?
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 836 नवे रुग्ण आढळून आले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 80,74,365 झाली आहे. तर एकूण मृतांचा आकडा हा 1,48,174 वर पोहोचलाय. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 332 रुग्ण आढळलेत, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.