रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. काही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नसली तरीही त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सौम्य लक्षणं असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता राजधानी दिल्लीतही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. नवी दिल्लीमध्ये कोरोनाचे 24 तासांत 15 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा दर 15.34 टक्के पोहोचला आहे. तर या व्हायरसमुळे 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये 31 हजार 498 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये 2 हजार 796 रुग्ण सापडले होते. 


5 दिवसांमध्ये ही संख्या 15 हजारहून अधिक एवढी पोहोचल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं टेन्शन वाढलं आहे. दिल्लीमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर लॉकडाऊनवर विचारविनिमय सुरू आहे. लग्नासाठी देखील कठोर निर्बंध लावण्याबाबत विचार सुरू आहे. 


महाराष्ट्रात काय परिस्थिती?
राज्यात 36 हजार 265 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा 20 हजारांच्या वर गेला आहे. तसेच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.