दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. सध्या बाधीत रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. यामुळेच दुसऱ्यांदा काही राज्यांत लॅाकडाऊन लावण्याची गरज लागली आहे. परंतु अशा परिस्थितीत असे काही लोक आहेत, ज्यांना याचं गांभिर्य नाही. विकेंड कर्फ्यूसाठी दर्यागंज भागात शनिवार आणि रविवार पोलिस बंदोबस्त होता. त्यावेळा रविवारच्या कर्फ्यू दरम्यान अशाच एका कपल सोबत दिल्ली पोलिसांचा वाद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिस बंदोबस्ताच्या वेळी एक कार आली. पोलिस कर्मचार्‍यांनी ही कार थांबवली. कारमधील दोन लोकांनी मास्क घातले नव्हते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखले. तेव्हा गाडीत बसलेल्या कपलने पोलिसांना धमकावले.


त्या महिलेने प्रथम सांगितले की, तिचे वडील पोलिसात SI (सब इंस्पेक्टर) आहेत. जेव्हा पोलिस त्यांच्या धमकीला घाबरले नाहीत, तेव्हा ती महिला थेट म्हणाली - 'मला याला (सोबत असलेल्या युवकाला) किस्स करायचे आहे, तर तुम्ही काय कराल!'



ना कर्फ्यू पास, ना फेस मास्क


या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, ही महिला केवळ पोलिसांवरच ओरडतच नव्हती तर, त्यांना त्यांच्या औकादीत राहण्याची ही धमकी देते होती.


व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की,  पोलिसांनी जेव्हा त्यांना थांबवले, तेव्हा हे जोडपे कारमधून बाहेर आले आणि पोलिसांवर आवाज चढवायला लागले. ते सतत  पोलिसांना विचारत होते की, त्यांची कार का थांबली आहे? यादरम्यान, या महिलेने रुबाबात सांगितले की, तिचे वडील पोलिसात एसआय आहेत. त्या महिलेला मास्क न घालण्याचे कारण विचारताच आपल्याबरोबर आलेल्या पुरुषाकडे लक्ष वेधले आणि म्हणाली," मला याला किस करायचे आहे, तुम्ही काय कराल!"


सोशल मीडियावर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती महिला असे म्हणतानाही दिसली की, "मी विचार केला किंवा सगळ्या लोकांनी विचार केला तर, तुमचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सर्व लोकं चने विकत बसतील.  लाज वाटत नाही का तुम्हा लोकांना… मी यूपीएससीची परीक्षा दिली आहे आणि मला सर्व नियम व कायदे माहित आहेत."


महिलेच्या अशा वागण्यावर 2008 च्या आयएएस बॅचचे अधिकारी अवनीश शरण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांने ट्विटरवर रीप्लाय देताना लिहले की, 'मॅडमने यूपीएससी क्लिअर केले आहे आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करणार्‍यांना काय शिक्षा होते हे कृपया त्यांना कायद्याच्या भाषेत सांगा.'



यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याकडे ना कर्फ्यू पास होता, ना मास्क होता. कर्फ्यू पास शिवाय घर सोडण्याचे आणि मास्क न लावण्याचे कारण विचारले असता त्या जोडप्याने इंस्पेक्टर और SI यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरवात केली. त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, इथे कोरोना वैगरे काही नाही. फक्त लोकांना त्रास देण्यासाठी हे केले जात आहे.


यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांना  बोलावले आणि दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले. या जोडप्यावर कलम 188 सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय पावती देखील फाडण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींचे नाव पंकज दत्ता आणि आभा यादव असे सांगितले आहे.