Niki Yadav Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांडाने (Shraddha Murder Case) दिल्ली हादरली असतानाच पुन्हा अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लातील्या एका ढाब्यावर असलेल्या फ्रिजमध्ये पोलिसांना मुलीचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे. दिल्लीतल्या बाबा हरिदासनगर इथे ही घटना घडली आहे. निकी यादव (Niki Yadav) असं मृत मुलीचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निक्की यादव ही प्रियकर साहिल गेहलोत (Sahil Gehlot) याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहत होती. पण तिचा प्रियकर दुसऱ्याच मुलीशी लग्न करण्याच्या बेतात होता. याची माहिती निक्कीला लागली यावरु दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. साहिलने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी निक्कीने दिली होती. त्यामुळे साहिल दबावात असलेल्या साहिलने निक्कीला संपवण्याचा कट रचला. त्यानंतर संधी मिळताच साहिलने निक्कीची हत्या केली. याप्रकरणी पोलीस (Delhi Police) अधिक तपास करत आहेत. 


आरोपीने सांगितली हत्येची कहाणी
आरोपी साहिल गेहलोतने सकाळी आपली गर्लफ्रेंड निकी यादवची हत्या केली. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी घरच्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. पोलिसांना दिलेल्या जबाबाबत साहिल गेहलोताने ही माहिती दिली. 10 फेब्रुवारीला साहिलने दिल्लीजवळच्या ISBT जवळ निक्कीची कारमध्ये गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कारमध्येच ठेऊन तो संपूर्ण दिल्ली फिरला. पण मृतदेह टाकण्यासाठी कुठेच जागा न मिळाल्याने त्याने तो मृतदेह एका ढाब्यावरच्या फ्रिजमध्ये लपवला. 



पोलिसांनी मिळाली माहिती
या प्रकरणी एडीसी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी त्यांना एका मुलीचा मृतदेह दिल्लीतल्या एका ढाब्यावरच्या फ्रिजमध्ये सापडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तपासानंतर पोलिसांनी आरोपी साहिल गेहलोतला ताब्यात घेतलं. 


दिल्लीतलं श्रद्धा हत्याकांड
याआधी दिल्लीतलं श्रद्धा हत्याकांड संपूर्ण देशात गाजलं. श्रद्धा वालकर आणि आरोपी आफताब पुनावाला हे दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात होते. भांडणातून आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने नवा फ्रिज विकत घेतला. त्यानंतर तो रोज रात्री डस्टबीन बॅगेत मृतदेहाचे थोडे थोडे तुकडे टाकून ते मेहरौलीच्या जंगलात फेकून देत होता. इतंकच नाही तर श्रद्धाची हत्या केल्यानतंर त्याच फ्लॅटमध्ये त्याने दुसऱ्या गर्लफ्रेंडलाही आणलं होतं.