मिठाईमधून विष देऊन 4 मुलींना संपवल्यानंतर वडिलांची आत्महत्या; एक वर्षापूर्वी आईची...
जेव्हा जन्मदाता बापच मुलींचं जीवन संपतो... संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली आहे. एका बापानेच चार मुलींच आयुष्य संपवून स्वतः आत्महत्या केली आहे.
दिल्लीतील रंगपुरी परिसरात एका घरी 5 लोकांचे मृतदेह सापडले आहे. यामध्ये वडील आणि 4 मुलींचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे नाव हिरालाल असून तो कारपेंटरचं काम करत होता. या व्यक्तीने आपल्या चारही दिव्यांग मुलींना सल्फासच्या गोळ्या मिठाईमधून देऊन त्यांची हत्या केली आहे. यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेने दिल्ली हादरली आहे. आपल्या पोटच्या मुलींचाच जीव घ्यावा, असं या बापाला का वाटलं असेल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृतदेहांशेजारी सल्फासच्या गोळ्या सापडला आहेत. 50 वर्षीय हिरालाल कुटुंबासह रंगपुरी गावातील एका भाड्याच्या घरात राहत होता. कुटुंबात 18 वर्षांची मुलगी नीतू, 15 वर्षांची निशी, 10 वर्षांची नीरू आणि 8 वर्षांची मुलगी निधी अशा चार दिव्यांग मुली होत्या. तर हिरालालच्या पत्नीचे वर्षभरापूर्वीच कॅन्सरने निधन झाले होते.
घरातून दुर्गंधी आल्यावर
हिरालाल यांनी मुलींची हत्या करुन आत्महत्या केली. यानंतर घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत होती. शुक्रवारी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी पोलिसांनी शेजारच्या व्यक्तींकडून याबाबत माहिती देण्यात आली. घरात घाण वास येत असल्यामुळे घरमालकालाही बोलावण्यात आलं.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर घराचा दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये 5 सडलेल्या अवस्थेत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मृतदेह आढळले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाने सुतार असलेले वडील हिरालाल यांनी आधी सर्वांना विष खाऊ घातला आणि नंतर ते स्वतः प्यायले, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलिसांना मृतदेहाजवळ सल्फासच्या गोळ्या आणि रूमच्या डस्टबिनमध्ये ज्यूसचे टेट्रा पॅक आणि पाण्याच्या बाटल्या सापडल्या.
चारही मुली दिव्यांग
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल यांच्या चारही मुली दिव्यांग होत्या. 18 वर्षांची मुलगी नीतू, 15 वर्षांची निशी, 10 वर्षांची नीरू आणि आठ वर्षांची मुलगी निधी. चारही मुलींना अपंगत्वामुळे चालता येत नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यातील एक मुलगी अंध होती. एकीला चालायला त्रास होत होता.
वर्षभरापूर्वी पत्नीचा मृत्यू
हिरालाल यांच्या पत्नीचा वर्शभरापूर्वीच मृत्यू झाला होता. कॅन्सर झाल्यामुळे हिरालालच्या पत्नीचं निधन झालं. यानंतर त्याच्यावर चारही दिव्यांग मुलींची जबाबदारी आली होती. यामुळे हिरालाल आपलं घर चालवण्यासाठी घराबाहेरही ठेवणं कठीण झालं होतं. तसेच त्याच्यावर आर्थिक संकट देखील होतं. यामुळे त्याने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे.