मुंबई : कठुआ बलात्कार हत्या प्रकरणात दिल्लीच्या लॅबने धक्कादायक खुलासा केला आहे. फॉरेंसिक टेस्टमध्ये आरोपींविरोधात सर्वात मोठा पुरावा मिळाला आहे. टेस्ट रिपोर्ट ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, बकरवाल समुदायाच्या 8 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही दुर्दैवी घटना जम्मूच्या रसाना गावांतील मंदिरात झाली आहे. 


रिपोर्टने केला मोठा खुलासा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टमध्ये अशी देखील माहिती मिळाली आहे की, त्या पीडित मुलीला नशेची औषध देण्यात येत होती. या रिपोर्टमुळे आरोपींविरोधात आता पोलिसांना खंबीर आरोप मिळाले आहेत. कारवाई पूर्ण होताच जम्मू काश्मीरचे पोलिस रिपोर्ट घेऊन कोर्टात जाणार आहे. 


इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून जम्मू काश्मीरने जप्त केलेल्या केसांच्या डीएनए टेस्टवरून ही माहिती स्पष्ट झाली आहे की, ते केस पीडित मुलीचे होते. तसेच रिपोर्टमध्ये ही देखील माहिती मिळाली आहे की, पीडित मुलीला क्लोनाजेपम नावाची औषध दिली आहे. ही औषध ज्यांना फिट येण्याचा आजार असतो त्यांनी दिली जातात. तसेच मिळालेल्या रिपोर्टनुसार, अधिक प्रमाणात याचा डोस पीडित मुलीला दिला जात असे. 


मिळाले हे पुरावे 


घटनास्थळावरून मिळालेल्या सुख्या आणि ओल्या मातीवरून हे स्पष्ट झाले आहे की, पीडित मुलीचे रक्त त्यामध्ये आहे. तसेच केसांवरू हे स्पष्ट झाले आहे की, आरोपी शुभम सांगरा याचे डीएनए मॅच झाले आहेत. शुभम हा मुख्य आरोपी सांझी राम यांचा भाचा आहे. या प्रकरणात सांझी रामचा मुलगा देखील सहभागी आहे.