G20 Dinner Menu : दिल्लीत प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या G-20 शिखर परिषदेसाठी (Delhi G20 Summit) जगभरातील नेते दाखल झाले आहेत. शिखर परिषदेत मांडण्यात आलेला जाहीरनामा सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला आहे. सदस्य देशांनी हा जाहीरनामा सर्वसहमतीने मंजूर केल्याबाबत मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. दिवसभर महत्त्वाच्या विषयांवर तोडगा निघाला असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलंय. अशातच पहिल्या दिवसानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचं ( G20 Summit Gala Dinner) आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपतीच्या डिनरमध्ये अनेक मेजवानींची आरास करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक चविष्ठ पदार्थांचा समावेश करण्यात आला. G-20 मधील मेन्यूकार्ड (G20 Dinner Menu card) सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.


मेन्यूकार्ड काय काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या डिनरला सुरुवातीला अन्नपदार्थांना (स्टार्टर) पात्रम, ताजी हवा का झोंका असं म्हणण्यात आलं आहे. यामध्ये दहीवडा, भारतीय मसालेदार चटणीमिश्रीत कंगनी, श्रीअन्न, लिफ क्रिप्स आदी अन्नपदार्थ आहेत. मुंबई पाव हा प्रसिद्ध पदार्थ ठेवण्यात आला. कांद्याच्या बियांपासून बनवलेला मऊ पाव त्याला मुंबई पाव असं म्हणतात. 


मुख्य डिनरमध्ये ग्लेझ्ड फॉरेस्ट मशरूम, कुटकी श्रीअन्न, कडीपत्त्यांसह बनवलेला केरळचा लाल भात आणि फणसाचं गॅलेट, मिष्टान्नांमध्ये सांवा हलवा, अंजीरआडू मुरब्बा, आंबेमोहर राईस क्रिप्स यांचा समावेश करण्यात आलाय. तर पेयपदार्थांमध्ये काश्मिरी काहवा, फिल्टर कॉफी आणि दार्जिलिंग चहा तसेच पानाचा स्वाद असलेलं चॉकलेट आदी पदार्थांचा समावेश आहे.


अतिथी देवो भव:


दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि 170 पाहुणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डिनर पार्टीला उपस्थित राहिले. परदेशी पाहुण्यांना काय खायला द्यायचं याचा अंतिम निर्णय कार्यक्रमाचे यजमान घेतात. अतिथी देवो भव: ची कल्पना लक्षात घेऊन, असा मेनू तयार केला जातो. परदेशी पाहुण्यांना भारताची संस्कृती कळावी अन् त्यांना त्यांच्या आवडीचा पदार्थ खायला मिळाला, याची सांगड घातली जाते. 



डिनरचा प्रोटोकॉल


डिनर पार्टीला कार्यक्रमाला उपस्थित असलेले पंतप्रधान किंवा सर्वात वरिष्ठ अधिकारी राष्ट्रपतींच्या उजव्या बाजूला बसतात. त्याचवेळी दोन नंबरचे ज्येष्ठ मंत्री किंवा अधिकारी डाव्या बाजूला बसतात. यानंतर, उर्वरित पाहुणे पद आणि ज्येष्ठतेच्या आधारावर दोन्ही बाजूला बसलेले असतात, त्यांच्यासाठी प्रोटोकॉल ठरून दिलेला असतो. त्यात कोणतीही चूक होऊन चालत नाही. त्याचबरोबर प्रत्येकाला व्यवस्थित जेवण मिळालं की नाही, याचं नियोजन देखील अधिकारी करत असतात.