दिल्लीत या `3` अटींवर ऑड-इव्हनचा फॉर्म्युला होणार लागू
कोटला मैदानावर भारत श्रीलंकेच्या टेस्ट मॅचदरम्यान `स्मॉग` मुळे ड्रामा रंगला. त्यानंतर दिल्लीतील `स्मॉग` आणि प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेमध्ये आला आहे.
मुंबई : कोटला मैदानावर भारत श्रीलंकेच्या टेस्ट मॅचदरम्यान 'स्मॉग' मुळे ड्रामा रंगला. त्यानंतर दिल्लीतील 'स्मॉग' आणि प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेमध्ये आला आहे.
दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्याकडे सार्यांचे लक्ष वेधल्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजवाल यांनी ऑड इव्हन बाबतचा अॅक्शन प्लॅन मांडला आहे. यामधून महिलांना तसेच दुचाकींनादेखील सूट मिळणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या असतील या ३ अटी
दिल्लीमध्ये ऑड - इव्हन प्लॅन लागू करताना महिलांना सूट मिळणार नाही.
ऑड इव्हन फॉर्म्युला दुचाकींनाही लागू होणार
ऑड इव्हन फरम्यान दिल्लीमध्ये ट्रकला प्रवेशबंदी देण्यात आली आहे.
प्रदूषणात वाढ
दिल्लीमध्ये प्रदूषण पातळीमध्ये वाढ झाल्याने स्मॉगचा त्रास वाढला होता. दरम्यान यामुळे दिल्लीत व्हिजिबिलिटी कमी झाली होती. अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. यापूर्वी दोनदा दिल्लीमध्ये ऑड इव्हन लागू करण्यात आला होता. मात्र त्यावेळेस महिला, व्हिआयपी, दुचाकींना सूट देण्यात आली होती. मात्र आता ही सूट मिळणार नाही.