नवी दिल्ली : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी (Police) मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनांना (Terrorist Organization) फंडिग करणाऱ्या एंजटला पोलिसांनी अटक केलीय. मोहम्मद यासीन (Mohammad Yaseen) असं या एजंटचं नाव आहे. (delhi hawala agent mohammad yasin arrested used to manage funds for lashkar and al badar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर खो-यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या हवाला एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय.  दिल्ली पोलीस आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या हवाला एजंटला अटक केलीय. 


यासीन हा लष्कर ए तोयबा (Lashkar-e-Taiba) आणि अल बद्र (Al-Badr) सारख्या दहशतवादी संघटनांना तो पैसे पुरवण्याचं काम करत होता. यासीनंनं कश्मीरमधील एका दहशतवाद्याला 10 लाख रुपये पुरवले होते, ते पैसे नंतर दहशतवादी कारवायांसाठी वापरले गेल्याची माहिती उघड झालीय. 


काही दिवसांपूर्वीच यासीनला हवालाच्या माध्यमातून 24 लाख मिळाले होते. त्यातील 17 लाख रुपये त्यानं जम्मू-कश्मीरला पाठवले. याआधी त्यानं 10 लाख रुपये अब्दुल हामिद नावाच्या दहशतवाद्याला पाठवले होते.