नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना सोमवारी ईडीने अटक केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ईडीने जैन यांच्या घरावर छापा टाकला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंमलबजावणी संचालनालयाने सत्येंद्र जैन यांना कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणूकीच्या आधी एक वक्तव्य केलं होतं. निवडणुकीपूर्वी  ईडी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करू शकते, असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं.