नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi)कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus)होणाऱ्या मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली आहे. दिल्लीमधील परिस्थिती इतकी भयाण झालीय की,कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीही जागा सापडत नाहीय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान घाट आणि स्मशानभूमीत जागा मिळणे कठीण झालंय. बर्‍याच ठिकाणी मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी 2-3 दिवस लागत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.


दिल्लीतील सरकार (Delhi) आणि तीन महापालिकांना शहरातील मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा वाढविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने (Delhi High Court) सर्व पक्षांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.



दिल्लीत कोरोनाची साथ शिगेला पोहोचली आहे. शहरातील सर्व रुग्णालयातील बेड्स भरले आहेत. शिफारशी असूनही लोकांना कोणत्याही रुग्णालयात प्रवेश मिळत नाही.


ऑक्सिजनच्या अभावामुळे दिल्लीतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आतापर्यंत दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच याठिकाणी रेमेडिसिव्हिर इंजेक्शनची कमतरता देखील आहे. यामुळे दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.


ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत दिल्लीत (Delhi) दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने (Delhi High Court)आधीच दखल घेतली आहे. आता कोर्टाचे दुसरे खंडपीठ त्यावर सुनावणी घेत आहे. कोर्टाच्या सूचनेवर दिल्ली सरकारने म्हटले आहे की, दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा आणि उपचारात मदत करण्यासाठी सैन्याची मदत घेण्यात येणारेय. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाला पत्रही पाठविण्यात आले आहे.