दिल्ली हत्याकांडात ट्विस्ट; हत्येआधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पण आरोपी साहिल नसून...
Delhi Murder Case: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या साक्षी हत्यकांडात एक धक्कादायक अपडेट समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे.
Delhi Murder Case: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली हत्याकांडात धक्कादायक वळण आलं आहे. एफएसएलच्या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येआधी तिच्यावर आत्याचार झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी साहिल नसून दुसराच कोणी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हत्याप्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे. त्यात ही बाब नमूद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. तेव्हा काही सँपल घेण्यात आले होते. आता एफएसएलच्या अहवालानुसार मुलीवर शारिरीक जबरस्ती करण्यात आली होती. मात्र तो आरोपी साहिल नसून दुसराच कोणीतरी आहे, दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण बलात्काराच्या आरोपांतर्गंत दाखल करण्यात आले आहेत. मग यात जरी तरुणीची सहमती असेल तरीही या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा नोंद होऊ शकतो.
एफएसएलच्या अहवालानुसार, अल्पवयीन तरुणीच्या शवविच्छेदनात मिळालेल्या सॅम्पलसोबत साहिलचे डीएनए जुळलेले नाहीत. त्याऐवजी दुसऱ्याच एका व्यक्तीचे डीएनए मिळाले आहे. दरम्यान, 28 मे रोजी ही घटना घडली होती. तेव्हा आरोपी साहिलने भर रस्त्यात मुलीवर चाकूने वार केले होते. त्यानंतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील ही घटना घडली होती. भररस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीवर चाकूने तब्बल दहाच्यावर वार केले होते. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड खालून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. दरम्यान भरवस्तीत आरोपी साहिल तरुणीवर निर्घृण वार करत होता. मात्र तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच पोलिसांनी 20वर्षीय आरोपी साहिलला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही रिलेशिनशिपमध्ये होते. मात्र दोघांमध्ये भांडण झाल्याने साहिलने तिची हत्या केली.
अल्पवयीन तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत जवळीक वाढल्याने साहिल तिच्याव नाराज होता. ब्रेकअपनंतरही तो सातत्याने तिला त्रास देत होता. त्याला वैतागून अल्पवयीन मुलीने तिच्याच घराजवळ राहणाऱ्या एका मुलाला साहिलला दम द्यायला सांगितले होते. यावरुन साहिल संतापला होता. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा कट रचला. साहिलने 28 मे रोजी अल्पवयीन तरुणी मैत्रिणीच्या घरी जात असताना तिची हत्या केली.
पोलिसांनी दाखल केली 640 पानांची चार्जशीट
पोलिसांनी या प्रकरणात 640 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहेत. यात हत्येचा गुन्ह्यासह पॉक्सो अॅक्टची नोंदही करण्यात आली आहे.