Delhi Crime : श्रद्धा वालकर प्रकरणानंतर आता दिल्लीतल्या आणखी एका हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलय. दिल्लीच्या पांडव नगरमध्ये (delhi pandav nagar) पत्नीने मुसासह मिळून आपल्या पत्नीची निर्घुणपणे हत्या केलीय. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करत ते विविध ठिकाणी फेकून देण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला होता. त्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तब्बल 6 महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झालाय. दिल्ली गुन्हे शाखेने (Delhi Crime Branch) या प्रकरणाचा तपास करत आरोपींना अटक केलीय. आरोपींनी अटकेनंतर आपल्या गुन्ह्याची कबुली देत हत्येचे कारण सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या पतीची हत्या


पोलीस आयुक्त रविंद्र यादव यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली. मृत अंजन दास हा पूनम यांचा तिसरा पती होता. पूनमचे पहिले लग्न हे सुखदेव तिवारीसोबत झाले होते. सुखदेवने पूनमला सोडल्यानंतर कल्लू याच्यासोबत त्याची ओळख झाली. कल्लूपासून पूनमला तीन मुले झाली. कल्लूचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर पूनमने अंजन दाससोबत राहण्यास सुरुवात केली.


सावत्र मुलाने केली हत्या


अंजन दास हा लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता. अंजनची पहिली पत्नी आणि 8 मुले बिहारमध्ये राहत होती. अंजन दास गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून बेपत्ता होता. अंजनची हत्या त्याचा सावत्र मुलगा दीपकने केली होती. या हत्येत दीपकची आई पूनमनेही तिला साथ दिली. दीपक आणि पूनमने दारुमध्ये झोपेच्या गोळ्या देऊन चाकूने त्याचा गळा कापला आणि छातीवर वार करत हत्या केली.


हत्येनंतर दीपकने संपूर्ण रक्त वाहून जाण्यासाठी मृतदेह तसाच सोडून दिला. दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे तुकडे करुन प्लास्टिकच्या पिशवीत भरुन ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.



हत्येचे कारण अखेर समोर


अटकेनंतर पूनमने सांगितले की, अंजन घटस्फोटित मुलगी आणि दीपकच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून होता. यावरुन अनेकदा त्यांच्यात भांडणे देखील झाली. पण अंजनने कोणाचेच ऐकले नाही. त्यानंतर अंजनची हत्या करण्यात आली. दीपकने लग्नानंतर शेजारीच एक खोली भाड्याने घेतली होती. हत्येच्या दिवशी त्याने बहिणीला पत्नीकडे बोलवून घेतले. त्यानंतर आई आणि अंजनसोबत बोलायचे आहे असे सांगून दीपक शेजारी झोपायला गेला आणि त्याने हत्या केली.