रस्त्यावर आढळला तरुणाचा मृतदेह, CCTV पाहिलं असता पोलीस चक्रावले, अख्खी बसच त्याच्या....
Crime News: दिल्लीमध्ये (Delhi) रस्ता ओलांडणाऱ्या एका फूड डिलिव्हरी बॉयला बसने चिरडलं होतं. तरुणाचा मृतदेह रस्त्यात आढळल्यानंतर पोलिसांना तपास सुरु केला होता. यावेळी पोलिसांनी या मार्गावरील 20 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी तरुणाच्या मृत्यूचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
Crime News: दिल्लीच्या (Delhi) सिव्हिल लाइन परिसरात 3 जून रोजी पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. बेवारस आढळलेल्या या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. मृतदेहाजवळ कोणतंही ओळखपत्र पोलिसांना सापडलं नव्हतं. तसंच एकही साक्षीदार नव्हता. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या मार्गावरील 20 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी तरुणाच्या मृत्यूचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
सिव्हिल लाइन परिसरात या तरुणाला बसने चिरडलं होतं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्हीत तरुण रस्ता ओलांडत असताना बस त्याने चिरडून जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. बसची चाकं तरुणाच्या अंगावर जाऊन त्याचा अक्षरश: चेंदामेंदा करतात. पण यानंतरही बसचालक बस न थांबवता वेगाने पुढे घेऊन जातो. हे धक्कादायक सीसीटीव्ही पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.
तरुण बसखाली आल्यानंतर चालक बस न थांबवता मागील चाकंही त्याच्या अंगावर घालत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा तरुण फूड डिलिव्हरी बॉय होता. बसने चिरडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी 20 सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आयएसबीटी मोरी गेटच्या दिशेने येत होती. आयपी कॉलेजजवळ तिने यु-टर्न घेतला. यावेळी 27 वर्षीय डिलिव्हरी बॉय धनवीर सिंह बसच्या खाली आला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी बस केली जप्त, चालक अटकेत
आरोपी बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज खान असं चालकाचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 3 जूनला सकाळी 5.30 वाजता तो प्रवाशांना घेऊन उत्तराखंडहून येत होता. प्रवाशांना आयएसबीटी काश्मीर गेटवर त्याला सोडायचं होतं. याचवेळी ही दुर्घटना झाली. पोलिसांनी बसही जप्त केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, 3 जूनला पीसीआरला फोन आला होता. यावेळी एक तरुण सिव्हिल लाइन ठाणे क्षेत्रात जखमी अवस्थेत पडला असल्याचं सांगण्यात आलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एएसआय पवन मौके घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्याला सुश्रुत ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचवण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
या अपघाताचा कोणीही साक्षीदार नव्हता आणि मृत तरुणाजवळ कोणतंही ओळखपत्र नव्हतं. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करत तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांना तरुणाला बसने चिरडलं असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्या रस्त्यावरील पुढील मागील सगळीकडचे सीसीटीव्ही तपासून पाहिले. दोन किमी आधी एका पेट्रोल पंपावरुन या बसची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलं. पोलिसांनी बसही जप्त केली आहे.