सेक्स जेलचा पर्दाफाश; अनेक मुलींची सुटका
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या स्पेशल टीमने ही छापेमारी केली.
नवी दिल्ली : अनेक घटनांमध्ये कारवाई होऊनही या देशातील बाबा, बापू, आणु बुवांचे कारानामे आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. राजधानी दिल्लीतील पोलिसांनी नुकताच आध्यात्मिक विस्वविद्यालय आश्रमावर छापा मारला. या छाप्यानंतर अनेक मुलींची सुटका करण्यात आली. या आश्रमत महिला आणि मुलींना बंदीवान बनवून ठेवल्याचा अनेकदा आरोप केला जात होता. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल टीमने ही छापेमारी केली.
महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या देखरेखेखाली छापा
राजधानी दिल्लीतील रोहिणी परिसरात असलेल्या या आश्रमात अनेक महिला, मुलींना बंदीवान बनवन ठेवण्यात आले होते. इते एक सेक्स जेलच (कारागृह) चालवले जात असल्याचा अनेकांचा आरोप होता. आलेल्या तक्रारींनुसार पोलिसांनी या आश्रमावर मंगळवारी छापा टाकला. पोलिसांनी काही मुलींना मुक्त केले तर, दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवालही उपस्थित होत्या.
उच्च न्यायालयानेच दिले होते चौकशीचे आदेश
दिल्ली उच्च न्यायालयानेच पोलिसांना नॉर्थ दिल्लीतील या अध्यात्मिक आश्रमाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आश्रमावर एका एनजीओने आरोप केला होता की, इथे महिला आणि मुलींना अशा पद्धतीने बंदिवान बनवून ठेवले होते की, जसे गुरमीत राम रहिमच्या आश्रमात आढळून आले होते. इथे एक सेक्स जेल (कारागृह) चालवला जात असल्याचाही आरोप होता.
कारवाईचे व्हिडिओ शूटींग करा - न्यायालय
न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायाधीश सी. हरिशंकर यांच्या खंडपिठाने म्हटले होते की, ही एक अत्यंत धोकादायक गोष्ट आहे की, ईश्वराच्या नावाखाली महिला, मुलींना बंदिवान बनवले जात आहे. खंडपीठाने डीसीपींना आदेश दिले होते की, रोहिणी येथील अध्यात्मिक आश्रमाची डीसीपी दर्जाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करावी. दिलेल्या आदेशात असेही म्हटले होते की, तपासाचे व्हिडिओ शूटींगही करण्यात यावे. तसेच, कारवाई वेळी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती यांनीही पोलिसांसोबत रहावे. दरम्यान, ज्या व्यक्तींना छाप्यादरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.