राजधानी दिल्लीत पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली असता आतमध्ये जे चित्र होतं ते पाहून हादरले. घरातमध्ये फक्त 2 महिला आणि 43 पुरुष होते. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. रात्रीच्या वेळी अचानक पोलिसांनी धाड टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नेमकं काय सुरु आहे याची स्थानिकांमध्ये चर्चा रंगली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही बेकायदेशीर गोष्टी जप्त केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या पश्चिम विहारमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. येथे संध्याकाळ होताच एका घराच्या बाहेर लोकांची गर्दी होण्यास सुरुवात होत होती. जवळपास राहणाऱ्या लोकांनाही येथे नेमकं काय सुरु आहे हे समजत नव्हतं. संशय बळावत असल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनीही नेमकं काय सुरु आहे याची माहिती मिळवण्यासाठी या घऱावर धाड टाकली. 


घऱात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये जे चित्र होतं ते पाहून पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. आतमध्ये सट्टाबाजार सुरु होता. पोलिसांनी यावेळी जुगार रॅकेट चालवत असल्याप्रकरणी 2 महिलांसह 45 लोकांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात पश्चिम विहार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पोलीस उपायुक्त जिमी चिरम यांनी सांगितलं की, स्थानिक पोलिसांना शुक्रवारी रात्री मुल्तान नगर येथे एका घऱात जुगार रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. पोलीस निरीक्षक पवन कुमार आणि पोलीस उप-निरीक्षक चंदन पासवान यांच्या नेतृत्वात एक टीम गठीत करण्यात आली होती. त्यांनी घऱावर छापा मारुन दोन महिलांसह 45 जणांना अटक केली आहे. 


पोलिसांनी छाप्यात 9 लाख 53 हजार 495 रुपये रोख, पत्त्याची 18 पाकिटं, 16 फासे, 25 आयताकृती प्लास्टिक टोकन आणि 96 गोल टोकन जप्त करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. पोलीस याप्ररणी आरोपींकडे चौकशी करत आहे.