नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट दिसून येतेय. काल दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्यातलं सर्वाधिक थंड तापमानाची नोंद झाली आहे. १९०१ सालानंतर प्रथमच म्हणजेच तब्बल ११८ वर्षांनंतर दिल्लीत डिसेंबर महिन्यात ५.८ सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. आठवड्या अखेरीस तापमान ४अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज  हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारठला आहे. काश्मीरमध्ये अंशाच्या खाली तापमान गेल्याने गारठा वाढला आहे. श्रीनगरमध्ये या मौसमातलं सर्वात कमी तापमान बुधवारी रात्री नोंदंवलं गेलं. उणे पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने दललेकही बर्फाच्छादित झालं आहे. कडाक्याच्या थंडीमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. 


देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडी आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. २८ आणि २९ डिसेंबरला थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच धुक्यांचं प्रमाण वाढणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.