नवी दिल्ली : ब्लू व्हेल गेममुळे आणखीन एका मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील अशोक विहार परिसरात ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक विहार परिसरातील ११व्या इयत्तेत शिकणा-या विद्यार्थ्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 


चौथ्या मजल्यावरुन उडी मारल्याने हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर त्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.


या विद्यार्थ्यांचं नाव कुश असल्याची माहिती समोर आली आहे. कुशने ज्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पोलिसांना चप्पल, चश्मा आणि मोबाईल फोन मिळाला आहे. 


कुश इमारतीवरुन खाली पडल्यानंतर तेथे उपस्थित नागरिकांनी या घटनेची माहिती त्याच्या कुटूंबियांना कळवली. त्यानंतर कुशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार कुशला गंभीर दुखापत झाली आहे. 


कुश मोंटफोर्ड शाळेतील ११व्या इयत्तेत शिकत आहे. यापूर्वी तो दुस-या शाळेत शिकत होता. असं म्हटलं जातं की, शाळेतील जुन्या मित्रांना मिस करत असल्याने तो डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळेच त्याने हे पाऊल उचललं आहे.