नवी दिल्ली : सीएएविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आंदोलनाचा आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे. या संघटनेशी संबंधित एका दाम्पत्याला पोलिसांनी संशय आहे. ओखलाच्या जामियानगरमधून एका दाम्पत्याला अटक करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलीस उपाध्यक्ष प्रमोद सिंह कुशवाह यांनी दिली. या दोघांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जहानजेब सामी आणि हिना बशीर बेग असं या दाम्पत्याचं नाव असून त्यांचा संबंध आयसिसच्या खुरासान मॉड्यूलशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे दाम्पत्य सीएएविरोधी आंदोलन भडकवण्याचं काम करत असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय. तसंच दिल्लीत हल्ल्या करण्याचा त्यांचा मनसुबा असल्याचंही सांगण्यात येतंय.


इंडियन मुस्लिम युनाईट नावानं ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवत होते. त्याद्वारे सीएए, एनआरसी विरोधात लोकांना भडकवण्याचं काम करत होते. काश्मीरचे रहिवासी असणारं हे दाम्पत्य ऑगस्टपासून दिल्लीत वास्तव्यास होतं. त्यांच्याकडे जिहादी साहित्यही आढळून आलंय.