नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे आढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दिल्ली हिंसाचारवर दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे. तणाव पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई का केली नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने ओढलेत. तणाव पसरवणाऱ्याविरोधात कारवाई केली नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील परिस्थिती योग्य रितीने हाताळली नसल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर ओढलेत. पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी करेल असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी घेत वादग्रस्त भाषण करणाऱ्या नेत्यांच्या क्लिप पाहिल्या. यावेळी भाजप नेते कपील मिश्रा यांची वादग्रसत वक्तव्याची व्हिडिओ क्लिप न्यायालयात दाखवण्यात आली. यावेळी न्यायालयात सर्व वकील, डीसीपी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. अत्यंत बेजबाबदार वक्तव्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. 



हिंसाचाराला मोदी सरकार जबाबदार - सोनिया गांधी


दरम्यान, दिल्लीतल्या हिंसाचारावरून जोरात राजकारण रंगलंय. दिल्लीतल्या हिंसाचाराला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलाय. दिल्लीतल्या दंगलीप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलीय. तर काँग्रेस हिंसाचाराचं राजकारण करत असल्याचा पलटवार केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरांनी केलाय. तसंच राजीनाम्याची मागणी हास्यास्पद असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. 


दरम्यान दिल्लीतील घटनेला गृहमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. असा हिंसाचार म्हणजे गुप्तचर यंत्रणेचं अपयश असून  पंतप्रधानांनी पारदर्शक चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर दिल्लीत सगळ्यांनीच शांतता राखायला हवी, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले आहे.