मुंबई : आपल्या सगळीकडून सोशल मीडियाचे तोटे ऐकू येतात. परंतू आता जगात सोशल मीडियाचे आभार मानावे तेवढे कमी. याचा प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोच्या माध्यमातून येत आहे. एक वृद्ध महिला तिच्या हरवलेल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू तिच्या वाट्याला अपयश येत आहे. आयुष्याचा अशा वळणावर जीवनाचा आधार हरवल्याने ही वृद्ध महिला फार हतबल झाली आहे. 'मी फार गरीब आहे. कृपया मझी मदत करा' असे लिहीलेला तक्ता या महिलेच्या हातात आहे. सध्या तिचा हा फोटो व्हाट्सअॅप, फेसबूक आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या १८ महिन्यांपासून नेपाळच्या तुरूंगात बंद असलेल्या वृद्ध महिलेच्या मुलाचे नाव महेंद्र वर्मा असे आहे. मुलगा जेलमध्ये असल्याने ही महिला भीक मागून आपली भुक भागवते. त्याचप्रमाणे व्हायरल होत असलेल्या या तक्त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


वृद्ध महिला बनारसमध्ये वास्तव्यास आहे. नेटकरी सोशल मीडियावर या वृद्ध महिलेसाठी सकारात्मक प्रतिसात देत आहेत. डीजिटल मीडियाच्या जागात महिलेचा आवाज पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची मागणी नेटकरी करत आहेत. परराष्ट्रमंत्री जर पाकिस्तानमधून लोकांची सूटका करू शकतात, तर माझ्या मुलाला नेपाळमधून का नाही सोडू शकत. आता मी माझ्या मुलाला कसं सोडवू. असा प्रश्न या वृद्ध महिलेला पडला आहे.