Amazon मध्ये नोकरीची संधी; फक्त 4 तास काम करून कमवा 70 हजार रुपये महिना
जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे
मुंबई : जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. डिलिवरी बॉयचे काम करण्याबाबत अनेकजण संकोच करतात. परंतु हे काही सोपं आणि हलक्या दर्जाचं काम नाही. अनेक बेरोजगारांसाठी हा चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. विशेषतः या नोकरीत वेळेचे काही बंधन नाही. पूर्ण वेळ, पार्ट टाइम जसे शक्य होईल तसे तुम्ही हे काम करू शकता. नुकतेच कंपनीने म्हटले आहे की, कंपनी लवकरच 20 हजार जणांची भरती करणार आहे.
कामाचे प्रोफाईल
ऑनलाईन किंवा रिटेल कंपन्यांचे प्रोडक्ट्स पॅकेज ग्राहकांपर्यंत पोहचवणे हे डिलिवरी बॉयचे काम असते. डिलिवरी बॉय ऍमेझॉनच्या वेअर हाऊसमधून पॅकेज घेऊन ग्राहकांपर्यंत पोहचवतात.
10 ते 15 किमी रेंज
भारतातीत बहुतांश शहरांमध्ये ऍमेझॉन आपल्या सेंटरपासून 10 ते 15 किमीपर्यंत पॅकेज डिलिवरी देते.
शिफ्टची वेळ
डिलिवरी बॉयला पूर्ण दिवस काम करण्याची गरज नाही. डिलिवरी बॉय सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत काम करू शकतात. या दरम्यान अनेकजण फक्त 4 तास काम करून 100 ते 150 पॅकेज डिलिवर करतात.
अप्लाय कसे करावे
इच्छुक उमेदवारांना ऍमेझॉनच्या https://logistics.amazon.in/applynow च्या संकेतस्थळावरून अर्ज करताय येईल.
पगार
ऍमेझॉनच्या डिलिवर बॉयला महिन्याला नियमित पगार मिळतो. जर कोणी बॉय महिन्याला दररोज 100 पॅकेजची डिलिवरी करीत असेल तर, आरामात 60 ते 70 हजार रुपये महिना कमाऊ शकतो.