मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासंदर्भात सुनावणी
आरक्षणावर आलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : आरक्षणावर आलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी स्थगितीचा आदेश देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
न्यायमूर्ती एल.एन.राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी सुनावणी घेणार. यात शैक्षिणक प्रवेश प्रक्रिया आणि नोकरी भरती प्रक्रियेतील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तर गायकवाड कमिटीचा रिपोर्ट न पाहता न्यायालयाने स्थगिती दिली. तर गायकवाड कमिटीचा अहवाल महाराष्ट्र सरकारचे वकील न्यायालयात वाचून दाखवणार आहे.
यावर विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडले आहेत. इंदिरा सहानी खटल्याचा आधार घेऊन मराठा आरक्षणावर स्थगिती दिली होती. मात्र तो खटला मागासवर्गीय आरक्षणाबाबत होता, तर मराठा आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागास हा नवा प्रवर्ग तयार करून देण्यात असल्याचा मुद्दा विनोद पाटील यांच्यातर्फे मांडण्यात येणार आहे.