नवी दिल्ली : सणांचे दिवस सुरू आहेत... दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. पण, सोन्या-चांदीचं मार्केट मात्र थंड पडलंय. ज्वेलरी शॉप, चमचमणारे शोरुम रिकामे पडलेले दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी नवरात्र आणि दसऱ्यालाच ग्राहकांची बाजारात गर्दी वाढू लागते. यंदाचं वर्ष मात्र याला अपवाद ठरतंय. ज्वेलर्सच्या म्हणण्यानुसार, जीएसटी आणि केवायसीच्या नियमांमुळ यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावरही सोन्याची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्के घटलीय... अशीच परिस्थिती दिवाळीतही दिसण्याची शक्यता वर्तवली जातेय. 


सोनारांच्या म्हणण्यानुसार, नोटाबंदीपासूनच विक्रीमध्ये घट दिसून येतेय. आता तर जीएसटी आणि पीएमएलए अॅक्टमुळे लोक सोनं खरेदीपासून चार हात लांबच आहेत. 


उल्लेखनीय म्हणजे, सरकारनं ५० हजार रुपयांहून जास्त ज्वेलरी खरेदी केल्यावर केवायसी गरजेचं केलंय. या नियमाचं उल्लंघन केलं तर पीएमएसए अॅक्टनुसार ग्राहकांवर कारवाई केली जाऊ शकते.