Stock Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी लक्ष द्या; 1 जानेवारीपासून बंद होणार डिमॅट खाते, जाणून घ्या कारण
Demat KYC update/cdsl KYC update : जे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात तसेच डेट सिक्युरिटीज खरेदी करतात. त्यांना 31 डिसेंबरपूर्वी त्यांचे केवायसी अपडेट करणे गरजेचे असणार आहे.
नवी दिल्ली: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही तुमचे केवायसी अजून अपडेट केले नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत अपडेट करा. अन्यथा तुमचे खाते डिऍक्टिव होऊ शकते.
31 डिसेंबरपर्यंत KYC अपडेट करा
NSD आणि CDSL यांनी जारी केलेल्या परिपत्रकात खातेधारकांना 6 प्रकारच्या KYC माहिती द्यावी लागेल, असे म्हटले आहे. त्यात नाव, पत्ता, पॅन, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि उत्पन्न आदींचा सामावेश आहे.
6 KYC तपशील अपडेट करणे गरजेचे
1 जून 2021 नंतर उघडलेल्या नवीन खात्यांसाठी सर्व 6 प्रकारच्या माहितीचे डॉक्युमेंट देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर सध्याच्या गुंतवणूकदारांना SEBI ने या 6 प्रकारचे डॉक्युमेंट अपडेट करण्यास सांगितले आहे.
कौटुंबिक माहिती अपडेट करा
जर एकच मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी एकापेक्षा जास्त डिमॅट खात्यांमध्ये आढळला आणि कुटुंबाची माहिती देखील अपडेट केली नाही, तर अशा डिमॅट खातेधारकांना त्यांना मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी बदलण्याचा फॉर्म सबमिट करण्यासाठी 15 दिवसांची नोटीस दिली जाईल.
खातेधारकांनी हे काम न केल्यास त्यांचे खाते नॉन-कंप्लायंट्समध्ये टाकण्यात येईल.