शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून Demat खात्याच्या नियमांमध्ये बदल
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून सर्व नवीन डिमॅट खात्यांसाठी नॉमिनेशन फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे.
मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून सर्व नवीन डिमॅट खात्यांसाठी नॉमिनेशन फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे. जे लोक नॉमिनेशन भरू इच्छित नाही. त्यांना यासंबधी वेगळा फॉर्म भरावा लागेल. सध्याच्या डीमॅट खातेधारकांना 31 मार्च 2022 पर्यंत नॉमिनेशन फॉर्म भरने गरजेचे असणार आहे. नॉमिनेशन किंवा डिक्लेरेशन फॉर्म न भरल्यास डिमॅट खात्यातून होणाऱ्या शेअरच्या खरेदी विक्रीवर निर्बंध येऊ शकतात.
नॅशनल सेक्युरिटी डिपॉजिटरी आणि सेट्रल डिपॉजिटरी सर्विसेसच्या रिपोर्टच्या मते, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 14.2 कोटी नवीन डिमॅट खाते उघडण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या तिप्पट आहे. शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नॉमिनेशनसंदर्भातील बाबी बारकाईने माहिती असायला हव्या.
नॉमिनेशन केव्हा करावे?
नॉमिनेशनची प्रक्रिया खूपच सोपी आहे. ज्यामध्ये डिमॅट खातेधारकाने आपल्या मनाप्रमाणे नॉमिनी निश्चित करणे गरजेचे असेल. डिमॅट खातेधारकाच्या निधनानंतर त्यांनी गुंतवणूक केलेले शेअर कोणाला देऊ इच्छितात, त्यासाठी नॉमिनेशन फॉर्म भरणे गरजेचे आहे.
एका खात्याला किती नॉमिनी?
एका डिमॅट खात्याला कमाल 3 जणांना नॉमिनी लावता येईल. खातेधारकाला सर्व नॉमिनींची भागिदारी निश्चित करावी लागेल. जेणेकरून खातेधारकाच्या मृत्यूनंतर कोणत्या वारसाला किती हिस्सा मिळेल.