मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांना सावध करणारा धक्कादायक रिपोर्ट पहा आज सायंकाळी 7 वाजता फक्त 'झी 24 तास'वर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज काल शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकॉऊंटची गरज असते. नोंदणीकृत ब्रोकरकडे डिमॅट अकॉऊंट सुरू करून शेअर्सची खरेदी विक्री करता येते. 


वाढत्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेअरची देवाण घेवाण मोबाईल ऍप किंवा वेबसाईटच्या आधारे अतिशय सोप्या पद्धतीने करता येते. परंतू डिमॅट अकॉऊंट डिजिटली हॅक करून गैरव्यवहार करणाऱ्या सायबर चोरांचा सुळसूळाट वाढला असून अशा अनेक तक्रारी सध्या नोंदवल्या जात आहेत.


नक्की अशा पद्धतीचे गैरप्रकार कसे होतात. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकॉऊंटवर सायबर भामट्यांचा हल्ला कसा होतो. डिमॅट अकॉऊंट हॅक करून त्या माध्यमांतून लाखोंचे घोटाळे कसे होतात? गुंतवणूकदार या प्रकरणाचे बळी ठरू नये म्हणून काय काळजी घ्यावी. यासंबधी पर्दाफाश करणारा रिपोर्ट आज सायंकाळी 7 वाजता 'झी 24 तास' वर पहा.