नवी दिल्ली : समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) सध्या एका संतापजनक घटनेची जोरदार चर्चा आहे. रूग्णालयाकडून शववाहिका मिळाली नाही म्हणून एका मुलाला आपल्या वडिलांचा मृतदेह चक्क सायकल रिक्षातून न्यावा लागला आहे. या घटनेचा फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होतो आहे.


उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील आहे. एक मुलगा सायकल रिक्षा चालवत आहे. रिक्षामध्ये एका व्यक्तिचा मृतदेह ठेवलेला दिसतो. हा मृतदेह त्या मुलाच्या वडिलांचा असल्याचे बोलले जात आहे.



रूग्णालयाकडून शववाहिका न मिळाल्यानेच या तरूणावर ही वेळ


दरम्यान, या घटनेला सर्वस्वी रूग्णालयच जबाबदार असून, रूग्णालयाकडून शववाहिका न मिळाल्यानेच या तरूणावर ही वेळ आली असल्याची टीका होत आहे. वृत्तसंस्था एनआयनेही हा फोटो ट्विट केला आहे. चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर आर. चंद्रा यांनी म्हटले आहे की, 'आमच्याकडे जिल्हा पातळीवर केवळ दोनच शववाहिका आहेत. तसेच, कम्यूनिटी हेल्थ सेटरवर तर, शववाहिकाच नाही.' दरम्यान, समाजमाध्यमांवर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.