Manish Sisodia Arrest:  दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामागे सीबीआयचा सिसेमिरा लागला होता. त्यानंतर आता सीबीआयने त्यांना अटक (Manish Sisodia Arrest) केली आहे. सिसोदिया यांना सीबीआयने गेल्या रविवारी समन्स बजावलं होतं. अर्थसंकल्पाच्या (Budget) तयारीचा हवाला देत त्यांनी वेळ मागितला होता. त्यानंतर आता सीबीआयने थेट कारवाई केली आहे.


पाहा ट्विट - 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारु उत्पादकांकडून 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच त्यांनी काही दारु उत्पादकांसाठी नियमावली जाहीर केली होती, असा आरोप सिसोदिया यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआयने कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर सीबीआयने वारंवार चौकशीची प्रक्रिया सुरू ठेवली. (Deputy Chief Minister of Delhi Manish Sisodia arrested by CBI latest marathi news)


AAP चा Manish Sisodia यांना पाठिंबा 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिसोदिया यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. तुरुंगात जाणं हा देश आणि समाजासाठी शाप नसून अभिमानाची बाब असल्याचं केजरीवाल म्हणालं होतं. केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मनीष...देव तुझ्यासोबत आहे. लाखो मुले आणि त्यांच्या पालकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. तू लवकरच तुरुंगातून परत येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिल्लीतील मुले, त्यांचे पालक आणि आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत, असं केजरवील म्हणाले.


आणखी वाचा - 


अटक होणार सिसोदियांना आधीच माहिती होतं?


आपल्याला अटक होणार, याचा अंदाज सिसोदिया यांना आला असावा. त्यांनी चौकशीला जाण्यापूर्वी ट्विट केलं होतं. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळं तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे, असं सिसोदिया (Manish Sisodia) म्हणाले होते.


Manish Sisodia  - आरोपी क्रमांक 1 


सीबीआय एफआयआरमधील आरोपी क्रमांक 1 असलेल्या सिसोदिया यांची मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. एका महिन्यानंतर, 25 नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं. सीबीआयच्या आरोपपत्रात सिसोदिया यांचं नाव नव्हतं, कारण त्यावेळी त्यांच्या आणि इतर संशयित आणि आरोपींविरुद्ध सीबीआयचा तपास चालू होता. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


मुख्य सचिवांनी दोन महिन्यांपूर्वी आपला अहवाल सादर केला होता. या अहवालात GNCTD कायदा 1991, व्यवसाय नियम 1993, दिल्ली उत्पादन शुल्क कायदा 2009 आणि दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010 च्या नियमांचे उल्लंघन आढळून आलं होतं. कोरोनाच्या बहाण्याने परवाना देताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सिसोदिया यांच्यावर करण्यात आला आहे.


दारू ठेकेदारांचे 144 कोटी रुपये करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाने मात्र हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. सीबीआयने कसून चौकशी केल्यानंतर आता अखेर दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध कारवाई केलीये.