मुंबई : छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्याच्या ट्रेनी डेप्युटी कलेक्टरला कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घेणं महागात पडलं. राज्याचे मुख्यमंत्री रमन सिंह यांना देखील मग या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनी डेप्युटी कलेक्टर अनुराधा अग्रवाल या दिव्यांग आहेत. अनुराधा यांना जिंकलेल्या रक्कमेतून भावाचा उपचार करायचा आहे. त्यांना भावाला किडनीच्या ऑपरेशनसाठी हे पैसे जिंकायचे होते. पण या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी अनुराधा यांना कोणताही परवानगी मिळाली नव्हती.


अनुराधा यांनी केबीसीमध्ये 15 लाख रुपये जिंकले. त्यानंतर जेव्हा त्या परत आपल्या घरी आल्या तेव्हा त्यांना कळालं की राज्य सरकारने त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची परवानगी नाकारली आहे.


अनुराधा यांनी सांगितले की मी कलेक्टर आणि राज्य सरकारकडे  परवानगी मागितली होती. वेळेवर परवानगी पत्र नाही मिळाले. म्हणून कलेक्टरकडून सुट्टी घेऊन मी मुंबईला आली.


जेव्हा अनुराधा मुंबईतून परत आल्या तेव्हा त्यांना कळवले गेले की. प्रशासन विभागाच्या उपसंचालकांनी त्यांना पत्र लिहून या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाकारली आहे.


राज्याचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी त्यानंतर मग अधिकाऱ्यांशी बोलून यावर तोडगा काढला. त्यानंतर अनुराधा यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या औपचारिक गोष्टी पूर्ण करण्यात आल्या.