चीनचे उप प्रधानमंत्री वांग यांनी गायले चीन-पाकिस्तानच्या मैत्रीचे गोडवे !
पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून चीनचे उप प्रधानमंत्री वांग यांग उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की, ``दोन्ही देश एकमेकांसाठी नेहमीच आधारभूत राहिले आहेत आणि आमची मैत्री लोखंडापेक्षा अधिक मजबूत आहे.`` चीनच्या सत्ताधीश कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीच्या सदस्यांपैकी वांग यांग हे प्रमुख नेता आहेत. त्यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात ते रविवारी इस्लामाबादला पोहचले. इस्लामाबादमध्ये स्वातंत्रदिनानिमित्त केलेल्या भाषणात ते म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रगती आणि विकासामध्ये चीन कायम सोबत असेल.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून चीनचे उप प्रधानमंत्री वांग यांग उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की, ''दोन्ही देश एकमेकांसाठी नेहमीच आधारभूत राहिले आहेत आणि आमची मैत्री लोखंडापेक्षा अधिक मजबूत आहे.'' चीनच्या सत्ताधीश कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीच्या सदस्यांपैकी वांग यांग हे प्रमुख नेता आहेत. त्यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात ते रविवारी इस्लामाबादला पोहचले. इस्लामाबादमध्ये स्वातंत्रदिनानिमित्त केलेल्या भाषणात ते म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रगती आणि विकासामध्ये चीन कायम सोबत असेल.
वांग यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ पाकिस्तानच्या दौऱ्यावर:
पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन आणि प्रधानमंत्री शाहिद खाकान अब्बासी यांच्यासोबत वांग म्हणाले की, कठीण परिस्थितीत चीन आणि पाकिस्तान नेहमी एकमेकांसोबत राहतील. आपली मैत्री कायम राहील आणि वर्षानुवर्षे अधिक घट्ट होईल.
त्यांनी सांगितले, "आमची मैत्री लोखंडापेक्षा अधिक मजबूत आणि मधापेक्षा अधिक मधुर आहे." वांग यांच्यासोबत उच्च स्तरीय चिनी प्रतिनिधीमंडळ देखील पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते आणि काही महत्त्वच्या करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची संभावना आहे.
चीन-पाक बहुपक्षीय रणनीती सहयोग:
त्यांच्या ५० अरब डॉलर चीन-पाकिस्तान आर्थिक करारांचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. वांग यांनी सांगितले की, पाकिस्तान ओबीओआरचा चीन हा महत्त्वपूर्ण साक्षीदार आहे. आणि इस्लामाबादसोबतचे बहुपक्षीय राजनीती मजबूत करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, आतंगवादाविरुद्धच्या लढाईत चीन पाकिस्तानच्या प्रयत्नांचे समर्थन करणार.