करिमगंज : आसाम विधानसभेचे नवनिर्वाचित उपसभापती कृपानाथ मल्लाह यांना समर्थकांचा अतिउत्साह चांगलाच नडला. नुकतीच उपासभापतीपदी निवड झाल्यानं मल्लाह यांची मिरवणूक काढण्याचा कार्यकर्त्यांनी घाट घातला. मल्लाह महोदयांना एका हत्तीवर बसवण्यात आलं. पण हत्तीला बहुदा हे रुचलं नसावं. हत्ती धावत सुटला आणि उपसभापती महोदय धाडकन खाली पडले. हे सारं काही कॅमेरात कैद झालं. आसामच्या कमरीगंज जिल्ह्यात राताबरी मतदारसंघात हा प्रकार घडला.


मिरवणूक महागात पडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पक्षाचे आमदार कृपानाथ मल्लाह यांना शनिवारी 6 ऑक्टोबर रोजी मिरवणूक चांगलीच महागात पडली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मल्लाह हत्तीवरुन खाली पडल्यानंतर कार्यकर्त्ये लगेचच त्यांना उचलवण्यासाठी धावले.


हत्ती अचानक धावत सुटला


हत्ती अचानक धावत सुटल्याने हत्तीवर बसलेला त्याचा मालक आणि विधानसभा उपसभापती दोन्ही खाली पडले. 5 ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत ते आसामचे उपसभापती निवडले गेले होते. आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील रातबारी मतदारसंघातून ते भाजपचे आमदार आहेत. सध्य़ा आसाम विधानसभा हिवाळी अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.