बाबा राम रहीम दोषी, सीबीआय विशेष न्यायालय आता 12 ऑक्टोबरला शिक्षा सुनावणार
Ranjeet Singh Murder Case: रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याला मोठा झटका बसला आहे.
नवी दिल्ली : Ranjeet Singh Murder Case: दोन साध्वींवर केलेल्या बलात्कार आणि एका पत्रकाराची हत्या केल्याप्रकरणी हरियाणातील रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याला मोठा झटका बसला आहे. रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात (Ranjeet Singh Murder Case) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहीम याच्यासह पाच आरोपिंना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने सर्व दोषींची 12 ऑक्टोबरला शिक्षा ठोठावणार आहे. (Dera chief Gurmeet Ram Rahim convicted in Ranjit Singh murder case)
राम रहीम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर
रणजित सिंह हत्या प्रकरणातील आरोपी डेरामुखी गुरमीत राम रहीम (Ranjeet Singh Murder Case) आणि कृष्णा कुमार शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर झाले. त्याचवेळी आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल थेट न्यायालयात हजर झाले.
रणजीत सिंह यांची 2002 मध्ये हत्या
कुरुक्षेत्रातील रणजीत सिंह (Ranjeet Singh), जे डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य होते, त्यांची 10 जुलै 2002 रोजी हत्या करण्यात आली. डेरा व्यवस्थापनाला संशय होता की रणजीत सिंहने साध्वीच्या लैंगिक शोषणाचे निनावी पत्र त्याच्या बहिणीकडून लिहिले आहे. रणजितसिंहचे वडील पोलिसांच्या तपासावर असमाधानी होते आणि त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करत जानेवारी 2003 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करताना आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 2007 साली न्यायालयाने आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले.
गुरमीत राम रहीम सुनारिया जेलमध्ये
गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याला ऑगस्ट 2017 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचवेळी, जानेवारी 2019 मध्ये, न्यायालयाने राम रहीम आणि इतर तीन जणांना 16 वर्षांपूर्वी एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हरियाणाच्या सुनारिया जेलमध्ये कैद आहे.