रोहतक : साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिमला २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याला रोहतक तुरुंगात ठेवण्यात आले आहे. यावेळी बाबा राम रहिमजवळ तुरुंगात महिला अधिकाऱ्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, त्याला ८ तास काम केल्यानंतर मोबदला म्हणून २० रूपये मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदाच्या दोन साध्वींचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याप्रकरणी राम रहिम तुरुंगात आहे. त्याने ११०० कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केलेय. त्याच्या डेऱ्याबाबत धक्कादायक बाबी पुढे आल्यात. तो डेऱ्यात साध्वींचा छळ आणि शौषण करीत असल्याची बाब पुढे आलेय. त्यामुळे  इतर कैद्यांप्रमाणेच त्याला ठेवण्यात आले आहे. त्याला फक्त एक पलंग देण्यात आला आहे. एवढेच नाही तर तुरुंगातील एकाही महिला कर्मचाऱ्याला राम रहिमच्या कोठडीपर्यंत जाऊ दिले जात नाही, असे वृत्त आहे. याबाबत 'इंडिया टुडे' ने वृत्त दिलेय.


बाबा राम रहिमला सध्या भाजी लागवडीचे काम देण्यात आले आहे. या भाज्या तुरुंगातील कैद्यांसाठीच वापरण्यात येणार आहेत, असे तुरुंग प्रशासनाने म्हटलेय. बाबा राम रहिमचा समावेश अप्रशिक्षित कैद्यांच्या गटात करण्यात आला आहे. 


राम रहिमने त्याला भेटायला येणाऱ्या १० लोकांची यादी पोलिसांना दिली आहे. ज्यापैकी त्याची आई नसीब कौरचे तपशीलच पडताळणीत स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नसीब कौर जेव्हा राम रहिमला भेटण्यासाठी आली होती तेव्हा तिने दोन धार्मिक पुस्तके, एक चप्पल जोड आणि काही कपडे आणले होते, असेही पोलिसांनी म्हटलेय.