#DeshKaZee : ZEEL-Sony च्या डील विरोधात चीनचा मोठा कट, कॉर्पोरेट घराण्याच्या हाती Invesco चा रिमोट
#DeshKaZee : ZEEL-Sony च्या डील विरोधात चीनचा मोठा कट, Invesco नक्की कोणाच्या हातातील कटपुतली? समजून घ्या संपूर्ण प्रकरण
मुंबई: झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि Sony च्या डीलसाठी इनवेस्को विरोध करत आहे. ZEEL-Sony च्या डील विरोधात चीन कनेक्शन आहे की काय? असा प्रश्न पडत आहे. याचं कारण म्हणजे हा चीनचा कट असल्याची संकेत मिळत आहे. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) च्या बाबतीत, इन्व्हेस्को स्वतःच अडचणीत सापडल्याचं दिसत आहे.
इनवेस्कोकडे ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे याचे उत्तर नाही. ZEEL विरुद्धच्या कटात चीनचा हात असल्याचे संकेत मिळाले आहेत. इनवेस्को हे फक्त एक प्यादे आहे, जे गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी वापरले जात आहे. काही मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांना चीनद्वारे ZEEL काबीज करायचं असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी ते इनवेस्कोचा वापर करून घेत आहेत.
#DeshKaZee सोबत चीन विरुद्ध मोहीम
ZEEL आणि सोनीने केलेल्या एका चांगल्या कराराला इनवेस्को पाय अडवण्याचा प्रयत्न करत आहे. आता प्रश्न हा आहे की इनवेस्को नक्की कोणाचं प्यादे म्हणून काम करतंय? इनवेस्कोबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चीनचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांना देशाच्या हितासाठी एकत्र यावे लागेल असंही ते यावेळी म्हणाले. तुम्हीही #DeshKaZee वर ट्वीट करून चीनविरुद्धच्या या मोहिमेचा एक भाग बनू शकता, असं आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केलं आहे.
ठोस बोर्ड नसेल तर का इन्व्हेस्कोला हवाय बदल?
इनवेस्कोकडे मनोरंजन विश्वातील उद्योगासाठी ठोस बोर्डचा प्रस्ताव किंवा कोणताही अनुभव नाही. आता प्रश्न असा आहे की मग इनवेस्कोचा हेतू काय आहे? हा एकच नाही तर असे अनेक प्रश्न या इनवेस्कोला घेऊन आहेत. Zee Entertainmentच्या बोर्डवर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी आणि दिग्गज नावांचा समावेश आहे. तर दुसरीकडे इनवेस्कोच्या बोर्डवर असं कोणतंही नाव नाही. ज्याच्याकडे मनोरंजन क्षेत्रातील दाणगा अनुभव आहे. मग कोणत्या आधारावर हे बोर्ड आहे? या इनवेस्कोची पारदर्शकता बाहेर येण गरजेचं आहे.
डॉ.सुभाष चंद्रा यांनी उपस्थित केले प्रश्न
झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड संस्थापक डॉ.सुभाष चंद्रा यांनी या प्रकरणावर एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले. सुभाष चंद्रा म्हणाले की, "ZEEL बद्दल काहीही प्रश्न असो, हे सांगणे आवश्यक आहे की ही कंपनी पुनीत गोयंका चालवत असो किंवा अजून कोणीतरी ती चालवत असो. कुणीतरी अशी व्यक्ती हवी जी पुढे घेऊन जाऊ शकते. याशिवाय शेअरधारकांना त्याचा फायदा मिळवून देऊ शकते.
गेल्या 30 वर्षांत मी या कंपनीसाठी घाम गाळून मोठ्या कष्टानं उभं केलं आहे. मला यामधून कोणता फायदा नाही किंवा नुकसानही नाही. मला ही मुलाखत CNBC, मनी कंट्रोलला द्यायची होती. पण, ते ही मुलाखत चालवणार सुद्धा नाहीत. कारण त्यांना केवळ वैयक्तीक फायदा दिसतो असंही यावेळी सुभाष चंद्रा यांनी आपलं मत व्यक्त केलं.
इन्व्हेस्कोकडे ठोस योजना नाही, गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
'सुभाष चंद्रा म्हणाले, "इनवेस्को खूप चांगला गुंतवणूकदार आहे. पण, ZEEL च्या बाबतीत ते पारदर्शकपणे कोणतीही गोष्ट सांगत नाहीत, ते याबद्दल काय करतील. व्यवस्थापन कोणाच्या हातात देईल. जर तुम्हाला पुनीत गोयंका काढायचे असतील तर ते काढून टाका, तुम्ही कोणाच्या हातात व्यवस्थापन देणार ते समोर सांगा. मात्र हे अजूनही इनवेस्को सांगत नाही.
इनवेस्कोने कोणाशीतरी व्यवहार केला आहे. बोर्डावर 6 संचालकांची नावे प्रस्तावित केली आहेत. त्यांची पार्श्वभूमी काय आहे? त्यांचा कोणत्याही एक्स कंपनीशी संबंध आहे का? कोणीही ते घ्यायचे आहे का? इनवेस्को उघड्यावर आले पाहिजे आणि नंतर भागधारकांना त्यांना इनवेस्को किंवा ZEEL-SONY करारासोबत जायचे आहे की नाही हे ठरवू द्या.
Invesco साठी ZEE कडून हे मोठे प्रश्न?
1. इनवेस्को कोणाच्या इशाऱ्यावर काम करते?
2. इनवेस्कोच्या मागे कोणतं षड्यंत्र आहे?
3. इनवेस्को गुंतवणूकदारांच्या हिताच्या विरोधात का?
4. इनवेस्को कॉर्पोरेट घराण्याच्या हातातील कटपुतली आहे?
5. तुम्ही अनुभव न घेता बोर्ड सदस्यांना प्रस्ताव का दिला?
6. इनवेस्को केवळ 18 टक्क्यांची चिंता बाकीचं काय?
7. जेव्हा तुमच्याकडे तुमची स्वतःची योजना नाही तर अडवणूक कशासाठी?
8. इनवेस्को आर्थिक गुंतवणूकदार आहे की धोरणात्मक घेणारी संस्था?
ZEEL बोर्डातील बदलांवर इनवेस्को अडवणूक करत आहे. बोर्डवर अनुभवी सदस्यांना घेण्यासाठी लग्गा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही कंपनी कोणाच्या हातातील कठपुतली आहे. इनवेस्कोकडून कोणतीही पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुनीत गोयंका यांना MD-CEO पदावरून हटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. इन्व्हेस्कोच्या या अशा कृतीमधून संकेत मिळत आहेत. इन्व्हेस्को एखाद्या बड्या घराण्याच्या हातातील कटपुतली आहे.