मुंबई : Desi Jugaad: उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra ) हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय दिसत असतात. ते मोजकेच व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे. तसेच काही व्हिडिओ पाहून गाडीही भेट दिली आहे. आता त्यांनी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून ते चकीत झालेत. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलेय आहे एक आविष्कार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधीकधी आपण अशा गोष्टींमध्ये अडकतो, ज्या आपण फक्त एका युक्तीने सोडवू शकतो. अशा युक्तीला भारतात देसी जुगाड असे नाव देण्यात आले आहे. असाच एक व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रा एकदम इम्प्रेस झालेत. 


आपल्याकडे अनेकवेळा घरात सामान पडलेले असते. त्याचा वापर करत नाही. मात्र, काही जण याचा योग्य वापर करत ते आपल्या समस्येवर मात करतात. असाच देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे , पेरु तोडण्यासाठी कॅचर बनवला, ज्याने भल्याभल्यांना आश्चर्य वाटले. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ शेअर करुन त्यांचे जोरदार कौतुक केले.


Anand Mahindra यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ इंटरनेट यूजर्सनी 4,00,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. आनंद महिंद्रा शोधकर्त्याच्या आउट-ऑफ-द-बॉक्स विचाराने खूप प्रभावित झाले. व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती लांबलचक काठी वापरताना दिसत आहे, ज्याच्या शेवटी प्लास्टिकची बाटली आहे. माणूस झाडावरची फळे तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने हा करत बाटलीच्या मागील बाजूस चार भागांमध्ये उघडतात आणि नंतर फळे पकडल्यानंतर बंद होतात.



जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 


त्या व्यक्तीने ते कसे बनवले हे देखील व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओला कॅप्शनसह ट्विट केले आहे, 'हा फार मोठा शोध नाही, पण मी उत्साहित करणार आहे. कारण हा छोटासा आविष्कार आपली संस्कृती दर्शवतो.