मुंबई : भारतात पावसाचं कमबॅक होताच पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये पूर आला आहे. तसेच काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून येते. मंगळवारी तेलंगणाच्या काही भागात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाले. मुसळधार पावसात पाणी तुंबल्याने वाहने वाहून जातात हे आपल्याला माहित आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते पाहिले देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु पाण्याच्या वेगापुढे आणि निसर्गापुढे आपण काहीही करु शकत नाही. आपल्याला बऱ्याचदा अशा परिस्थीतीत बघ्याची भूमीका घ्यावी लागते. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओमुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल.


कारण या व्हिडीओमध्ये आपली कार वाहून जाऊ नये म्हणून एक तरुणानं असा काही देजी जुगाड लावला ज्यामुळे त्याची कार वाहून गेली नाही. हा जुगाड खरोखरच उपयोगी ठरला.


इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, एका व्यक्तीने मुसळधार पावसात आपली कार वाचवण्यासाठी देसी जुगाडचा अवलंब केला. त्याने आपली कार दोरीने बांधली आणि नंतर काही लोकांच्या मदतीने ती दोरी छतावरून ओढून धरली आणि घराच्या वरच्या काँक्रीटच्या खांबांना बांधले. असे केल्याने पावसाच्या पाण्यात कार अर्ध्यवट बुडली गेली आणि कार एका ठिकाणी थांबले देखील


हा देसी जुगाड वापरल्याने या व्यक्तीचे दोन फायदे झाले, एकतर कार अर्धवट पाण्यात बुडाल्याने कारच्या जास्त आत पाणी गेलं नाही ज्यामुळे कारचं नुकसानं कमी झालं असावं. तसेच ही कार वाहून देखील गेली नाही.


अहवालांनुसार हा व्हिडीओ तेलांगणातील आहे आणि पुरात अनेक वाहने वाहून गेल्याचे पाहून कार मालकाला ही कल्पना आली.



हा देसी जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या व्हिडीओची खूप मजा घेतली आणि कार मालकाच्या युक्तीचे कौतुक देखील केलं आहे. अनेक यूजर्सने हा जुगाड स्वत: करुन पाहाणार असल्याचं देखील म्हटलं आहे.