Surat Devanshi Shanghvi:  कोट्यावधीची प्रॉपर्टी आणि अलिशान लाईफ स्टाईल या सगळ्याचा त्याग करुन एका आठ वर्षाच्या मुलीने खेळण्या बागडण्याच्या वयात संन्यास घेतला आहे.  देवांशी संघवी (Devanshi Sanghvi) असं या मुलीचं नाव आहे. सूरत येथील प्रसिद्ध हिरे व्यावसायिक (surat diamond merchant)  देवांशीचे वडिल आहेत (Surat News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे तरुणांवर पाश्चिमात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव पहायला मिळते आहे. तर, दुसरीकडे देवांशीसारखी मुल बालवयात आत्मसंयम आणि अध्यात्माकडे वळताना दिसत आहेत. आठ वर्षांची देवांशी  सांसारिक जीवनाचा त्याग करून संन्यासाचा मार्ग स्वीकारून साध्वी बनली आहे.


आठ वर्षांच्या देवांशीने आलिशान जीवनाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळण्याच्या वयात हिरे व्यावसायिक धनेश यांची वारसदार कन्या देवांशी संन्यास घेतल्यानंतर संन्यासी झाली आहे. देवांशी संघवी दोन बहिणींमध्ये मोठी आहे. 
देवांशीने दीक्षा कार्यक्रमात दीक्षा घेतली. देवांशी संघवीने 367 दीक्षा कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यानंतर तिला संन्यास घेण्याची प्रेरणा मिळाली. धनेश संघवी यांची मुलगी देवंशी संघवी दीक्षा घेतल्यानंतर साध्वी दिगंतप्रज्ञाश्री बनली आहे. देवांशीने आपल्या गुरु साध्वी प्रस्मिता श्रीजी यांच्याकडून कीर्तियश सुरीजी महाराज यांच्या सहवासात दीक्षा घेतली. 


दीक्षा घेतल्यानंतर देवांशी संघवी हिचे नाव साध्वी प्रस्मिता श्रीजी यांनी साध्वी श्री दिंगट प्रज्ञा श्रीजी असे ठेवले आहे. देवांशीची आई अमी संघवी याही धार्मिक आहेत. त्यानुसार त्यांनी त्यांची मोठी मुलगी देवांशी हिला धार्मिक संस्कार दिले आहेत.


35 हजार समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडला दीक्षा सोहळा


सुरतच्या वेसू परिसरात देवांशीचा दीक्षा सोहळा पार पडला. 35 हजार समाजबांधवांच्या उपस्थितीत देवांशीने दीक्षा घेतली. दिक्षा घेण्याआधी देवांशीची शोभा यात्रा काढण्यात आली. दीक्षा घेण्याआधी देवांशीला नव वधुप्रमाणे सजवण्यात आले होते.  हत्ती-घोडा आणि बँड वाद्यांसह देवांशीची रथामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. दिक्षा घेण्यापूर्वी देवांशीने आपल्या गुरूंसोबत सुमारे 600 किलोमीटरची पदयात्राही केली आहे. 


देवांशीचे वडिल प्रसिद्ध हिरे व्यापारी


देवांशीचे वडिल धनेश संघवी हे मोठे हिरे व्यापारी आहेत. धनेश संघवी हे मुळचे राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील माझगावचे रहिवासी आहेत. धनेश भाई संघवी आणि वडील मोहन भाई संघवी हे संघवी अँड सन्सच्या नावाने सुरत आणि मुंबईत हिऱ्यांचा व्यवसाय करतात. धनेश संघवी यांची गणना सुरतच्या मोठ्या हिरे व्यापाऱ्यांमध्ये केली जाते. धनेश संघवी यांना चार वर्षांची काव्या आणि आठ वर्षांची देवांशी अषा दोन मुली आहेत. देवंशी यांचा सुरुवातीपासूनच धार्मिक कार्याकडे कल होता आणि आता दीक्षा घेतल्यानंतर ती साध्वी दिगंतप्रज्ञाश्री बनली आहे.