मुंबई : लग्न म्हटलं की घरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. लग्न घरात फक्त लहान मुलचं नाही ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण खास क्षणांचा आनंद घेत असतो. सध्या लग्नसराई सुरू असून सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दीन त्याच्या दोन वहिन्यांमध्ये डान्स करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या दोन वहिन्या आणि दीराच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तिघेही जबरदस्त थिरकताना दिसत आहेत. दीर आणि दोन वहिन्यांमध्ये असलेल्या डान्स स्पर्धेमुळे लग्नात एक वेगळा रंग चढला आहे. पाहा व्हिडीओ... 



दीराचे एकापेक्षा एक डान्स स्टेप पाहून वहिन्या देखील तुफान डान्स करत आहेत. दीर आणि वहिन्यांमध्ये रंगलेल्या या जुगल बंदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


Ankit Jangid  नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ फार पूर्वी अपलोड करण्यात आला. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सध्या सर्वत्र याचं व्हिडीओची चर्चा आहे.