Dhanteras 2020 : धनत्रयोदशीची `या` वस्तू खरेदी करा आणि या करू नका
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं
मुंबई : पुराणात धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी सणाची सुरुवात मानली जाते. समुद्र मंथनादरम्यान अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी प्रकट झाले होते. तेव्हापासून हा दिवस धनत्रयोदशीच्या रुपाने साजरा केला जातो. या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी अनेकजण सोनं, चांदीचे दागिने खरेदी केले जातात. त्याप्रमाणे सोन्याचे नाणे देखील खरेदी केले जाते.
दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीच्या आधी लोकं मोठी खरेदी करतात. या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित आहे की कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे कधी-कधी लोकं चुकीच्या वस्तू देखील घरी घेऊन येतात. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र या दिवशी काही वस्तू ठरवून खरेदी करू नये.
या वस्तू खरेदी करु नका
काचेचं सामान - असं म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी काचेचं सामान चुकूनही खरेदी करू नये. कारण काचेचा संबंध हा राहूशी असतो. त्यामुळे या दिवशी काचेची वस्तू घेणं टाळा.
लोखंडाची वस्तू - या दिवशीची चुकूनही लोखंडापासून बनवलेली वस्तू घेऊ नका. जर अगदीच आवश्यक असेल तर धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी किंवा एक दिवसनंतर खरेदी करा. बरेच जण या दिवशी गाडीची खरेदी करतात. या दिवशी गाड्यांवर बऱ्याच ऑफरही असतात. पण जर तुम्ही गाडी घेणार असाल तर त्याचं पेमेंट एक दिवस आधी करून धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची डिलीव्हरी घ्या.
धारदार वस्तू - या दिवशी कोणतीही धारदार वस्तू खरेदी करू नका. जसं कात्री, चाकू किंवा एखादं हत्यार. यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
काळ्या रंगाची वस्तू - असं मानलं जातं की, काळा रंग हा नकारात्मकतेचा स्त्रोत आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला काळा रंग घालणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू खरेदी करू नका.
एल्युमिनिअमची भांडी - असं म्हणतात की, एल्युमिनिअम धातूवर राहूचा प्रभाव जास्त असतो. ज्यामुळे इतरही शुभ ग्रह प्रभावित होतात. तसंच एल्युमिनिअमचा वापर वास्तुशास्तर, आरोग्य आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही वाईट मानला जातो. कारण या धातूपासून बनवलेली एकही वस्तू पूजेमध्येही वर्ज्य मानली जाते.
या वस्तू खरेदी कराव्यात
झाडू - या दिवशी झाडू खरेदी करावा. असं म्हटलं जातं की, ज्या पद्धतीने झाडू आपल घर स्वच्छ करतो तसंच या दिवशी झाडूची खरेदी केल्याने सर्व वाईट गोष्टीची आणि दारिद्रयाची स्वच्छता होते. तसंच घरात सुखाचं आगमन होतं.
बिझनेस किंवा नोकरीशी निगडीत वस्तू - वास्तू एक्स्पर्ट्स मानतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या बिझनेस किंवा नोकरीशी निगडीत वस्तूंची खरेदी केल्यास ते शुभ असतं. यामुळे प्रगतीची दारं उघडतात आणि तुम्हाला भरपूर यश मिळतं. जसं तुम्ही व्यापारी असाल तर वहीखातं खरेदी करावं आणि जर शिक्षक असाल तर पेन किंवा पुस्तक.
धाण्याचं बी - शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी धाण्याच्या बिया खरेदी करणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते. खरेदी केलेले धणे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेमध्ये वाहावे आणि उरलेले कुंडीत लावावे. तुमच्या घरात जर धाण्याचं झाडं असेल तर ते शुभ मानलं जातं. तसंच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं. हवं असल्यास तुम्ही धणे पर्स किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता.
सोने- चांदीची नाणी - सोनं आणि चांदी भगवान कुबेराचे प्रिय धातू आहेत. जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने किंवा चांदीचं नाणं नक्की खरेदी करा. या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश, किर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते.
गणेश- लक्ष्मीची मूर्ती - दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्तीही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावी. अशी मान्यता आहे की, या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश-लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटापासून सुटका होते. ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी. पण लक्षात ठेवा की, या मूर्तीची उंची जास्त नसावी.
शंख - धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही घरात शंख आणून त्याची देवघरात ठेवून पूजा करावी. दिवाळी पूजेच्यावेळी शंखनाद नक्की करावा. यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होतं.