DHFL Scam: DHFL घोटाळा प्रकरणी ईडीने वाधवान बंधुंवर मोठी कारवाई केली आहे. ED ने वाधवान यांची हिऱ्यांचे दागिने आणि फ्लॅटसह 70 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत 28.58 कोटी रुपयांची पेंटिंग आणि शिल्पे, 5 कोटी रुपयांची घड्याळे, 10.71 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 9 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरमधील 20 टक्के स्टेक आणि वांद्रे येथील 17.10 कोटी रुपयांच्या 2 फ्लॅटचा समावेश आहे. ईडीने यासंदर्भात माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कथित बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून डीएचएफएलचे 2 संचालक कपिल वाधवन आणि धीरज वाधवन यांच्या 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांचे दागिने आणि फ्लॅट्स यासह मालमत्ता जप्त केल्या असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जाहीर केले.


हा घोटाळा 17 बँकांच्या कन्सोर्टियमचा समावेश असलेल्या 34 हजार 615 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित असल्याचे असे एजन्सीने निवेदनात म्हटले आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत 28.58 कोटी रुपयांची पेंटिंग आणि शिल्पे, 5 कोटी रुपयांची घड्याळे, 10.71 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 9 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरमधील 20 टक्के स्टेक आणि 2 फ्लॅटचा समावेश आहे. 


मालमत्तांची एकूण किंमत 70.39 कोटी रुपये आहे. डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान आणि धीरज वाधवन आणि इतर आरोपींनी युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय) च्या नेतृत्वाखालील बँकांच्या कन्सोर्टियमची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला. कथित कटाचा एक भाग म्हणून, कपिल वाधवन आणि इतरांनी बँकांच्या एका गटाला 42,871.42 कोटी रुपयांची मोठी कर्जे मंजूर करण्यास प्रवृत्त केल्याचे ईडीने म्हटले आहे.


'आरोपींनी डीएचएफएलच्या खात्यांच्या पुस्तकात फेरफार करून या निधीच्या महत्त्वपूर्ण भागाचा अपहार केला आणि त्याचा गैरवापर केला आणि या कन्सोर्टियम बँकांच्या कायदेशीर थकबाकीची परतफेड करण्यात चूक केल्याचे आढळून आले. यामुळे बँकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे कंसोर्टियम कर्जदारांना 34,615 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.