Dhirendra Krishna Shastri Brother Arrested: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या भावाला पोलिसांनी केली अटक, नेमका गुन्हा काय?
Dhirendra Krishna Shastri Brother Arrested: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा भाऊ शालीग्रामला पोलिसांनी अटक केली आहे. शालीग्रामवर दलित कुटुंबाला (Dalit Family) धमकावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं.
Dhirendra Krishna Shastri Brother Arrested: गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांना मोठा झटका बसला आहे. पोलिसांनी त्यांचा भाऊ शालिग्रामला अटक केली आहे. शालीग्रामवर एका दलित कुटुंबाला (Dalit Family) धमकावल्याचा आरोप आहे. एका लग्न समारंभात शालीग्रामने दलित कुटुंबाला धमकी दिली होती. याप्रकरणी छतरपूर पोलिसांनी शालीग्रामला अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी याप्रकरणी गेल्या महिन्यात शालीग्रामविरोधात तक्रार दाखल केली होती. अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शालीग्राम दलित कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
नेमकं काय झालं होतं?
गेल्या महिन्यात गढा गावातील एका कुटुंबात लग्न होतं. अहिरवार कुटुंबाने बागेश्वर धाममध्ये आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला, जी गोष्ट शालीग्रामला आवडली नाही. त्याने त्या मुलीच्या लग्नात पोहोचून गोंधळ घातला होता. शालीग्राम दलित कुटुंबाला धमकावत असल्याचा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. नंतर हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गावातील एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला होता.
व्हिडीओत शालीग्रामच्या हातात बंदूक असल्याचंही दिसत होतं. तसंच दलित कुटुंबाला धमकावताना, मारहाण करताना दिसत होता. यानंतर पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
शालीग्रामला अटक करण्याची मागणी लोक करत होते. दलित संघटनांनी याप्रकरणी आंदोलनही केलं होतं. यामुळे पोलिसांवर कारवाईसाठी प्रचंड दबाव निर्माण झाला होता. दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी भावाशी आपला संबंध नसून यामध्ये आपलं नावं गोवलं जाऊ नये असं म्हटलं आहे.