वज्रेश्वरी... महाराष्ट्रातील चमत्कारीक ठिकाण! पाऊस असो की थंडी इथं 12 महिने अखंड वाहणारे गरम पाण्याचे झरे

वज्रेशवरी देवीचे हे देवस्थान गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध आहे. 

| Oct 05, 2024, 16:08 PM IST

Vajreshwari Hot Springs :  महाराष्ट्रात वज्रेश्वरी नावाचे चमत्कारीक देवस्थान आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे ठिकाण आहे. याची खासियत म्हणजे पाऊस असो की थंडी इथं 12 महिने अखंड वाहणारा गरम पाण्याचा झरा आहे. 

1/7

महाराष्ट्रात एकूण 28 गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यापैकी 18 कुंड ही कोकणात आहेत. 

2/7

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला येतात. विशेष म्हणजे वज्रेश्वरी येथील गरम पाण्याच्या कुंडात औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते.   

3/7

गरम पाण्याच्या झऱ्यात गंधकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळं या पाण्यात स्नान केल्याने त्वचारोग बरा होतो. हे पाणी त्वचारोगासाठी गुणकारी असल्याचे सांगितले जाते. 

4/7

बाराही महिने हे गरम पाण्याचे झरे सुरूच असतात. या झऱ्यांना कुंडाच्या आकारात बांधून त्यात स्नान करण्यासाठी व हात पाय धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.   

5/7

गरम पाण्याचे झरे हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा येथील पाण्याची पातळी कायम समना असते. तसंच पाण्याच्या तापमानातही अजिबात फरक पडत नाही.   

6/7

अकलोली-वज्रेश्वरीच्या बाजूलाच गणेशपूरी आणि निंबवली ही गावे आहेत. यागावातही गरम पाण्याचे झरे आढळतात. 

7/7

अकलोली आणि वज्रेश्वरी हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दोन गावे आहेत. शेजारी- शेजारी असलेली ही गावे निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. मुंबईपासून अवघ्या 80 किमी अंतरावर हे गाव तानसा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.