Dhoom Style Theft: कोणाचं वाईट करायला जाऊ नका, कोणी ना कोणी तरी आपल्याला बघत असतो, असे आपल्याला सांगितले जाते. दरम्यान सोशल मीडियामुळे याची प्रचिती आपल्याला नेहमी येत असते. यामुळे जगात काहीही लपून राहू शकत नाही. अपघात, चोरी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या ट्रेण्ड होतोय. तुम्ही धूम सिनेमातील स्टंट पाहून दंग झाला असाल तर थांबा..या व्हिडीओतील स्टंट तुम्हाला ते विसरायला लावू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालत्या गाड्यांमधून चोरी करतानाचे सीन आपण सिनेमात पाहिले असतील. पण प्रत्यक्ष घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अवजड सामान असलेला ट्रक हायवेवरुन ट्रक संथ गतीने चालतोय. दरम्यान मागून बाईकवरुन आलेले चोर ट्रकच्या वर चढलेय आणि सामान चोरी करतायत असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


सामान चोरी करुन झाल्यानंतर चोरांनी तिथून पळ काढलाय. सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. इतक्या शांत डोक्याने चोरी करायला ही सिनेमाची शूटींग आहे का? ही चोरी ट्रकचालकाच्या संगनमताने झाली का?  ट्रक चालक चोरांचा साथीदार आहे का?असे अनेक प्रश्न सोशल मीडियात नागरिक विचारत आहेत.


 


 


पाहा व्हिडीओ


 



ट्रकमध्ये दोन्ही बाजूला आरसे बसवलेले असतात, ट्रक चालकाचे दोन्ही बाजुला लक्ष असते. अशावेळी या व्हिडीओतील ट्रक चालकाला काहीच दिसत नव्हते का? अशी शंका काहींना आली आहे. ट्रकचा स्पीडदेखील अजिबात न वाढल्याने ड्रायव्हर चोरांना साथ देतोय का? असा प्रश्न विचारला जातोय.


चोरी पूर्ण होईपर्यंत ट्रक बाजूच्या लेनमध्ये चालवत राहिला आणि तिघे चोरटे खाली उतरले. मात्र चोरी केल्यानंतर चालकाने लेन बदलल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे ट्रकचालकावरील संशय अधिक बळावलाय. या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.


चालत्या ट्रकमधून तीन चोरट्यांनी चोरी केली. आपल्याला कोणी पाहिलं नसेल असं त्यांना वाटतं होतं. ते तिघे देखील आपल्या चोरी करण्याच्या कामात मग्न होते. पण मागून चालणाऱ्या कार चालकाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केलाय. 


दरोडेखोर चालत्या ट्रकमध्ये घुसण्याची हिंमत करतायत. त्यांचे साथीदार चालत्या मोटारसायकलवरून थेट चालत्या ट्रकवर चढतायत. विशेष म्हणजे आपले काम संपवून चोरटे चालत्या ट्रकमधून खालीदेखील उतरताय. हे थरारक दृश्य कॅमेरात कैद झालंय. आता व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वेगाने व्हायरल झाल्याने या घटनेचा तपास केला जाईल. तसेच आरोपींनादेखील अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.