मुंबई : ज्यालोकांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढलं आहे. त्यांना हे माहितच असेल की, ड्रायव्हिंग लायस्नस मिळवण्यासाठी एक परीक्षा होते. ज्यामध्ये रस्त्यांवरील नियमांबाबत प्रश्न विचारले जातात. या परीक्षेसाठी काही प्रश्न उत्तरांचा चार्ट देखील उपलब्ध आहे, जो आपल्याला आरटीओ ऑफिस बाहेर सहज उपलब्ध होतो. याचा अभ्यास करुन आपल्याला ड्रायव्हिंग परीक्षा पास करता येते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच लायसन्स मिळतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु असं असलं तरी ट्रॅफिकची अशी काही चिन्हे किंवा साइन्स आहेत ज्यामुळे लोक गोंधळतात. तसेच काही वेळेला सरकार देखील नवनवीन चिन्ह आणत असतं, ज्यामुळे लोकांना अनेक चिन्हांची नव्याने ओळख होते. आजा आम्ही तुमची अशाच एका नवीन चिन्हाशी ओळख करुन देणार आहोत. ज्यामुळे पुढच्यावेळी हे चिन्ह पाहिल्यानंतर तुम्ही कंफ्यूज होणार नाही.


खरंतर हे चिन्ह सध्या बंगळुरूमध्ये लावलं असल्याचं पाहायला मिळालं आहे. परंतु याचा अर्थ माहित नसल्यामुळे तेथील एका व्यक्तीने या चिन्हाचा फोटो काढून ट्राफिक पोलिसांना पाठवला आणि त्याचा अर्थ विचारला. ज्यावर पोलिसांनी देखील उत्तर दिलं आहे.


@yesanirudh असे या ट्विटर युजरचं नाव आहे 1 ऑगस्ट रोजी हे चित्र शेअर केले आणि ट्रॅफिक पोलिसांना टॅग केले आणि विचारले – हे कोणते ट्रॅफिक चिन्ह आहे. त्याने पुढे लिहिलं की, हे हॉपफार्म सिग्नलच्या आधीच स्थापित केले आहे! त्यांच्या या ट्विटला 62 लाईक्स मिळाले आहेत. तसेच, काही वापरकर्त्यांनी सांगितले की त्यापूर्वी त्यांना या चिन्हाचा अर्थ काय आहे हे माहित नव्हते.



काहींनी हे चिन्ह पुढे खड्ड्यांचा इशारा देणारे फलक असावे असे सांगितले आहे.



या वाहतूक चिन्हाचा अर्थ काय आहे?


व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देताना, व्हाईटफिल्ड ट्रॅफिक पोलिस (@wftrps) ने लिहिले – प्रिय सर... हा एक चेतावणी देणारा फलक आहे, जो रस्त्यावर अंध व्यक्तीची संभाव्य उपस्थिती दर्शवतो. वाहन चालवताना काळजी घ्या. होपफार्म जंक्शन येथे दृष्टिहीनांसाठी एक शाळा आहे. जिथे हा फलक लावण्यात आला आहे.