Interesting Fact : घराबाहेर पडताना कायमच पाण्याची बाटली सोबत बाळगण्याकडे अनेकांचा कल असतो. तर काही मंडळी मात्र बाहेर विकत मिळणाऱ्या बाटलीबंद पाण्याला प्राधान्य देतात. सामानाचं ओझं नको म्हणून ही मंडळी पाणी विकत घेतात. प्रवासाला निघालं असतानाही हीच परिस्थिती पाहायला मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तहान लागल्यानंतर पाण्याची बाटली विकत घेतली जाते आणि त्यानंतर त्यातील पाणी पिऊन एकतर ती बाटली फेकली जाते, किंवा काही मंडळी ती सोबत घरी घेऊन जातात. हे बाटलीबंद पाणी पित असताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या आहेत का? विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या विविध पद्धतींनी भरलेल्या असतात. ज्यामुळं या बाटल्यांवर तशीच झाकणंही (Bottle Cap) तशाच पद्धतीची असतात. 


रेल्वे किंवा बसनं प्रवास करायचा झाल्यास पाणी खरेदी केलं असता हातात येणाऱ्या बाटलीचं झाकण सहसा निळ्या रंगाचं असतं. पण, असं का? पाण्याच्या बाटलीवर असणारं हे निळं झाकण ते पाणी क्षारयुक्त असल्याचं किंवा झऱ्याचं असल्याचं लक्षात आणून देतं. पाण्याच्या बाटलीला पांढरं झाकण असल्यास त्या बाटलीमध्ये सामान्य पाणी भरल्याचं लक्षात आणून दिलं जातं. 


विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटलीवर हिरवं झाकण असल्यास त्या पाण्यात एक्स्ट्रा फ्लेवर अर्थात नव्यानं चव मिसळल्याचं दाखवून दिलं जातं. काही ब्रँड त्यांच्या लोगोच्या रंगांमुळं झाकणाचे रंग त्याच अनुषंगानं ठेवतात, असं असलं तरीही हे ब्रँडसुद्धा पाण्यासंदर्भातील माहिती बाटलीवर देतात. 


हेसुद्धा वाचा : मानवाच्या नव्या प्रजातीचा शोध लागताच शास्त्रज्ञही हैराण; तब्बल 200000 वर्षांपूर्वी... 


बाटलीवरील झाकणाचा रंग वेगळा असला तर? 


बाटलीबंद पाण्यावर असणारं झाकण लाल रंगाचं असल्यास हे स्पार्कलिंग वॉटर असल्याचं सांगितलं जातं. रंगीत झाकणांचा वापर कार्बोनेटेड पाण्यासाठीसुद्धा केला जातो. बाटवलीवर पिवळ्या रंगाचं झाकण असल्यास त्यामध्ये विटामिन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स मिसळल्याचं सांगितलं जातं. काळ्या रंगाचं झाकण असणाऱ्या बाटलीमध्ये अल्कलाईन वॉटर असतं. हा रंग सहसा प्रिमियम प्रोडक्टसाठी वापरला जातो. पाण्याच्या काही बाटल्यांवर झाकणांचा रंग गुलाबी असून, हा रंग ब्रेस्ट कॅन्सर आणि काही धर्मदाय उपक्रमांचं प्रतीक असतो.