Mallikarjun Kharge : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजचा दिवस वादळी ठरत आहेत. सत्ताधारी पक्षाने  कॉंग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी असे म्हटले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. सोमवारी टीका करताना खरगे यांनी, तुमच्या घरचा कुत्राही देशासाठी मेला का? काँग्रेसने बलिदान दिले आहेत, असे म्हटले होते. खरगे यांनी मंगळवारी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आणि माफी मागण्यास नकार दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरगेंनी निराधार गोष्टी सांगितल्या - पीयूष गोयल


मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरुन राज्यसभेत आज अभूतपूर्व असा गोंधळ झाला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी हा मुद्दा उपस्थित करत खरगे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. "काल अलवरमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अशोभनीय भाषण केले. त्यांनी वापरलेली भाषा दुर्दैवी आहे. त्यांनी ज्या प्रकारे अपशब्द वापरले, निराधार गोष्टी सांगितल्या. तसेच देशासमोर खोटे बोलण्याचा प्रयत्न केला त्याचा मी निषेध करतो. त्यांनी माफी मागावी अशी मागणी करतो, असे गोयल यांनी म्हटले.


खरगे यांचा माफी मागण्यास नकार


"जे लोक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, तुम्ही त्यांना माफी मागायला सांगत आहात?" असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला.


सभापतींनीही झापलं


या प्रकरणी सभागृहात खरगे यांनी माफी मागावी अशी मागणी सुरू होताच उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी ही टीका संसदेबाहेर केली आहे असे म्हटले. "देशातील 135 कोटी जनता आपल्याकडे पाहत आहे. कदाचित कोणीतरी बाहेर काहीतरी बोलले असेल... तुम्ही लहान मूल नाहीत," असे खरगे यांनी म्हटले आहे.


काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?


काँग्रेसने  देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिलं. स्वातंत्र्यासाठी आमच्या पक्षाच्या नेत्यांनी प्राणांची आहुती दिली आहे. तुम्ही काय केलं? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का? कुटुंबातील कोणत्या सदस्याने त्याग केला आहे का?, अशी टीका खरगे यांनी केली होती.


तुम्ही 100 तोंडांचे रावण आहात का?; खरगेंची पंतप्रधानांवर टीका


"तुम्ही 100 तोंडांचे रावण आहात का?" मोदी सगळीकडे दिसतात, महापालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत, सगळ्याच निवडणुकीत मोदींचा चेहरा पुढे केला जातो. महालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या नावे मत मागा, पालिकेत गरज लागली तर मोदी काम करायला येणार आहेत का?,असा खोचक प्रश्न खरगे यांनी अहमदाबादमधील प्रचारसभेत विचारला विचारला होता.