नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशवासियांनी पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे.


आतापर्यंतची सर्वाधिक वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील क्रूड ऑइलच्या दरात वाढ झाल्याने देशात डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी दिल्लीत 59.70 रुपये प्रति लीटरने डिझेल विकलं. डिझेलच्या दरात ही सर्वात मोठी वाढ असल्याचं बोललं जातंय. सर्वच शहरांमध्ये डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.


सर्वच शहरांमध्ये दर वाढले


दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये डिझेलचे दर 3 ऑक्टोबर 2017 नंतर सर्वात जास्त नोंदवले गेले आहे. मुंबईमध्ये डिझेलचे दर 63.43 रुपये तर पेट्रोल 77.87 रुपये आहे. केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलवरील एक्साइज ड्यूटीमध्ये 2 रुपये प्रति लिटरमागे कपात केली आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना घरगुती गॅसच्या दरांमध्ये मासिक वाढ बंद करण्याचे निर्देशही दिले होते.